पुनवत : सागाव ते सरूड मुख्य रस्त्यावर तराळकी ओढ्यावर असणाऱ्या पुलाच्या संरक्षक लोखंडी पाइपचे कठडे तुटून शेतात पडल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन या ठिकाणी दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
सागाव बसस्थानकापासून काही अंतरावर सरूडकडे जाणाऱ्या मार्गावर तराळकी ओढा आहे. या ओढ्यावर रस्त्याच्या दुतर्फा लोखंडी पाइपचे संरक्षक कठडे आहेत. पुलावरच वळण रस्ता आहे. या लोखंडी कठड्याचा भाग शेतात कोलमडून पडला आहे. त्यामुळे येथे सर्वच वाहनांना धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने वाहनांना बाजू देता येत नाही.
संबंधित विभागाने येथे कोणतीही दुर्घटना होण्याअगोदर संरक्षक कठड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
फोटो : २५ पुनवत १
ओळी : शिराळा तालुक्यात सागाव-सरूडदरम्यान असणाऱ्या तराळकी ओढ्यावरील पुलाच्या एका बाजूचे संरक्षक कठडे खचले आहेत.