सांगली : चांदा ते बांदापर्यंत उभ्या, आडव्या पसरलेल्या महाराष्टची विभागानुसार ओळख वेगळी, संस्कृती वेगळी. याच अभिमानास्पद संस्कृतीचे बहारदार दर्शन शनिवारी वसंतदादा महोत्सवात शंभरावर कलाकारांनी घडविले. महोत्सवाच्या तिसऱ्यादिवशी ‘रंग मराठी मातीचा’या कार्यक्रमात वासुदेव, भारूड, कीर्तन, ओवीसह इतर पारंपरिक लोककलांच्या सादरीकरणास प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
वसंतदादा महोत्सवात शनिवारी लोकरंजन प्रस्तुत ‘रंग मराठी मातीचा’ हा कार्यक्रम झाला. महाराष्टतील विविध संस्कृती, परंपरा आणि ग्रामीण जीवनाचे दर्शन यावेळी कलाकारांनी अत्यंत प्रभावीपणे सादर केले. ‘सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला’ असे म्हणत येणाºया वासुदेवापासून ते प्रत्येकाचा अभिमानाचा क्षण असलेल्या ‘शिवराज्याभिषेक सोहळया’चे नयनरम्य दर्शन यावेळी कलाकारांनी घडविले.
कार्यक्रमाची सुरुवात वासुदेवाच्या गीताने झाली. त्यानंतर शेतकरी गीत सादर करत ‘जीवाचा मैतर ढवळ्या अन् पवळ्या’, ‘झुंजू मुंजू पहाट झाली, कोंबड्याने बांग दिली’, धनगरी नृत्य सादर करत ‘ सुंबरानं गाऊ चला’, ‘चांगभलं रं चांगभलं, देवा जोतिबा चांगभलं’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘दिंडी चालली विठ्ठलाच्या दर्शनाला’, ‘आम्ही ठाकर, ठाकर या रानाची पाखरं’, ‘लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला’, ‘नाचतो डोंबारी गं’ आदींसह इतर गीतांचे सादरीकरण करण्यात आले.
ओवी, भारूड, दिंंडी, वाघ्या-मुरळी, गण गवळण, आदिवासी गीत, धनगरी गीताने कार्यक्रमांची रंगत वाढविली. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. महाराष्टÑातील लोकजीवनाचे रंग दाखविणाºया या कार्यक्रमात शंभर कलाकारांनी सहभाग घेतला होता.आज ‘सिनेतारका...’रविवारी महोत्सवाचा चौथा आणि शेवटचा दिवस असून, यादिवशी ‘सिनेतारका आणि रोहित राऊत’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात युवा गायक रोहित राऊतच्या गायनाबरोबरच अभिनेत्री मानसी नाईक, श्रुती मराठे, माधवी निमकर आदींच्या बहारदार लावणी, नृत्यांचा कार्यक्रम होणार आहे.