कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण मोहिमेची जिल्हा परिषद सदस्या सुरेखा जाधव, राजश्री एटम, पंचायत समिती सदस्या सविता पाटील, सरपंच स्वप्नाली जाधव, आनंदराव पाटील (काका), मोहन जाधव, शहाजी पाटील, दिनेश जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कामेरी : कामेरी (ता.वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारपासून (दि. १०) ५९९ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे यांनी ही लस पूर्ण सुरक्षित असून, त्याचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही अफवांवर विश्वास न ठेवता सर्व ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले होते.
त्याला प्रतिसाद देत पहिल्या आठवड्यात ६० पेक्षा जास्त वय असणाऱ्या ४९४ ज्येष्ठ नागरिक व अन्य आजाराने त्रस्त व्याधीग्रस्त असणाऱ्या १०५ नागरिकांना, १५ आरोग्य कर्मचारी तर २७ आशा व अंगणवाडी सेविकांचा यामध्ये समावेश आहे. लस घेतलेल्यांत ९० वयाच्या हौसाबाई कापसे व माजी सरपंच अशोक कुंभार यांनी ही लस घेतली. कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कामेरी येडेनिपाणी, तुजारपूर, शिवपुरी, गाताडवाडी, विठ्ठलवाडी या गावात ज्येष्ठ नागरिकांसह ४५ ते ५९ वयोगटातील १७६० नागरिक व्याधीग्रस्त नागरिकांनीही आपले आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र घेऊन आरोग्य केंद्रात सोमवार, बुधवार व शुक्रवारी सकाळी ९ ते ५ या वेळेत लसीकरणासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. वाळवा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साकेत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नितीन चिवटे, डॉ. किरण माने या आरोग्य कर्मचारी यांचे मदतीने लसीकरण मोहीम राबवित आहेत. कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातीला लसीकरण मोहिमेची जिल्हा परिषद सदस्या सुरेखा जाधव, राजश्री एटम, पचायत समिती सदस्या सविता पाटील, सरपंच स्वप्नाली जाधव, आनंदराव पाटील (काका), मोहन जाधव, शहाजी पाटील, दिनेश जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली.