कुरळप : येथील दत्त वाहनधारक सहकारी पतसंस्थेला १४ लाखांवर नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अशोकराव पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले की, रघुनाथ पाटील यांच्या प्रेरणेतून दत्त उद्योग समूहातील विविध सहकारी संस्था यशस्वीरित्या कार्यरत आहेत. पतसंस्थेने सभासदांना केंद्रबिंदू मानून शेती, व्यवसाय, ऊसतोडणी, कंत्राटदार, ट्रॅक्टर मालक आदींना कर्जवाटप केले आहे. महिलांसाठी बचतगट तयार करून अल्प व्याजदरात कर्जवाटप केले आहे. सन २०२०-२१ या अर्थिक वर्षात पतसंस्थेने पाच कोटी ८३ लाख रुपयांचे कर्जवाटप केले असून, आठ कोटी रुपयांच्या ठेवी असल्याचे सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष नामदेव गायकवाड, रघुनाथ पाटील, प्रकाश पाटील, विलास पाटील, प्रमोद शेटे, एकनाथ गायकवाड, संजय परीट, गणपतराव पावसकर आदींसह सभासद शेतकरी उपस्थित होते.