शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

दत्तात्रय शिंदे सांगलीचे नवे पोलिस अधीक्षक

By admin | Published: June 09, 2016 4:30 PM

सांगलीचे पोलिस अधीक्षक सुनील फुलारी यांची सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक म्हणून बुधवारी बदली करण्यात आली. त्यांच्याजागी सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय तुळशीदास शिंदे

ऑनलाइन लोकमतसांगली, दि. ९ -  सांगलीचे पोलिस अधीक्षक सुनील फुलारी यांची सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक म्हणून बुधवारी बदली करण्यात आली. त्यांच्याजागी सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय तुळशीदास शिंदे यांनी नेमणूक करण्यात आली आहे. सांगलीत जेमतेम वर्षभराचा कालावधी मिळालेल्या फुलारी यांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा राबविल्या होत्या.सुनील फुलारी यांनी २० मे २०१५ रोजी सांगलीचे पोलिस अधीक्षक म्हणून पदभार हाती घेतला होता. त्यांच्या एक वर्षाच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था चांगली राहिली. पदभार हाती घेताच त्यांनी मिरजेचा गणेशोत्सव व ऊसदर आंदोलन कौशल्याने हाताळले. त्यामुळे गेल्या गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. ऊसदर आंदोलनावेळी दरवर्षी असणारी तणावाची स्थिती फुलारी यांच्या काळात कमी प्रमाणात जाणवली. इस्लामपूरसह तीन ते चार ठिकाणी दुहेरी खुनाच्या घटनाही या काळात घडल्या. या खुनांचा छडा लावण्यातही फुलारी यांना यश आले. पोलिसांच्या बदल्यांच्या गॅझेटबाबत दरवर्षी वादविवाद होत. यंदा मात्र फुलारी यांनी पारदर्शीपणे बदल्यांचे गॅझेट फोडल्याने कोणताही वाद झाला नाही. केवळ एका वर्षातच त्यांची सिंधुदुर्गच्या पोलिस अधीक्षकपदी बदली झाली आहे. फुलारी यांच्याजागी सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची नेमणूक करण्यात आली आहे. शिंदे यांनी सिंधुदुर्गमध्ये आदर्शवत कामगिरी केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक पदाच्या काळात त्यांनी गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी विशेष मोहीम सुरू केली. गुन्हेगारांना पकडण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशन, महिलांच्या सुरक्षिततेसाठी एफआयआर अ‍ॅप, प्रतिसाद अ‍ॅप व दामिनी पथक तैनात करणे याला त्यांनी प्राधान्य दिले. तक्रारींचे निवारण तात्काळ करता यावे यासाठी त्यांनी सोशल मीडिया विशेषत: व्हॉटस् अ‍ॅपच्या वापरावर भर दिला. त्यांनी यापूर्वी गडचिरोली, गोंदिया, सोलापूर, नवी मुंबई, मुंबई येथे विविध पदांवर काम केले आहे. येत्या तीन ते चार दिवसात ते पदभार स्वीकारतील, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केले. त्याला जनतेनेही चांगली साथ दिली. आपले काम सांगलीकरांना ज्ञात आहे. गुन्हेगारी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यात वर्षभराच्या काळात यश आले. आपल्या कारकीर्दीत जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्हा शांत ठेवण्यात यशस्वी ठरलो. - सुनील फुलारी, मावळते पोलिस अधीक्षकशहरच्या उपअधीक्षकपदी बच्छावे सांगली शहरच्या पोलिस उपअधीक्षकपदी सुहास बच्छावे यांची नेमणूक करण्यात आली आहे. बच्छावे सध्या पालघर जिल्ह्यात मीरा रोड ठाण्याकडे पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत होते. शहरच्या पोलिस उपअधीक्षकपदाचा प्रभारी पदभार धीरज पाटील यांच्याकडे आहे. प्रकाश गायकवाड यांच्या बदलीनंतर चार महिन्याने शहरला पोलिस उपअधीक्षक मिळाला आहे. नवे पोलिस अधीक्षकनवे पोलिस अधीक्षक दत्तात्रय गायकवाड मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आहेत. एम. एस्सी., जी. डी. सी. अ‍ॅन्ड ए. डी. सी. ए., एल. एल. बी. आदी शैक्षणिक पदव्या प्राप्त केलेल्या शिंदे यांनी १९९६ मध्ये परिविक्षाधीन पोलिस उपाधीक्षक या पदावर कारकीर्दीस सुरुवात केली. विशेष सेवा पदक, आंतरिक सुरक्षा पदक, विशेष सेवा पदकांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. यंदाच्या जानेवारीमध्ये त्यांची भारतीय पोलिस सेवेमध्ये (आयपीएस) पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे.