शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

मुलांना मारून दाम्पत्याची आत्महत्या

By admin | Published: December 29, 2015 12:44 AM

बनेवाडीतील घटना : सावकारांच्या त्रासाला कंटाळून केले कृत्य; दोन मुलांचा गळा आवळून घेतला गळफास

बोरगाव : बनेवाडी (ता. वाळवा) येथील दाम्पत्याने स्वत:च्या दोन मुलांचा गळा आवळत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. खासगी सावकारांच्या त्रासामुळेच दाम्पत्याने हे कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी पुढे येत आहे. संजय भीमराव यादव (वय ५0), पत्नी जयश्री यादव (३०), मुलगा राजवर्धन यादव (४) व मुलगी समृद्धी यादव (४ महिने) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. बनेवाडी येथील संजय यादव गावातील काही शेतकऱ्यांची शेती वाट्याने करीत होते, तर त्यांची पत्नी जयश्री टेलरिंग व्यवसायासह शेतीची कामे करीत होत्या. काही महिन्यांपूर्वी ताकारी येथे बेकरी व्यवसाय सुरू करण्यासाठी यादव यांनी बोरगावसह इतर गावच्या सावकारांकडून कर्ज घेतले होते, परंतु त्या व्यवसायात त्यांना मोठा तोटा झाला. परिणामी त्यांना सावकारांचे कर्ज चुकविता आले नाही. कर्जाची रक्कम वाढतच चालली होती. त्यामुळे सावकारांनी पैसे परत मिळण्यासाठी यादव यांच्याकडे तगादा लावला होता. या तगाद्याला कंटाळूनच यादव यांनी प्रथम दोन कोवळ्या मुलांना गळा आवळून ठार मारले. त्यानंतर पत्नीसह स्वत: घरातील तुळईस गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली. यादव गावातील हनुमान मंदिराच्या पाठीमागे नदीकाठी राहत होते. ते दररोज नदीवर पोहण्यासाठी जात असत. त्यांच्यासोबत पोहण्यासाठी जाणाऱ्यांनी सोमवारी सकाळी सहा वाजता घराचे दार ठोठावले, परंतु आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर सात वाजता नळाला पाणी आल्यानंतर शेजारच्या महिलांनी जयश्री यांना हाक मारून उठविण्याचा प्रयत्न केला. काहींनी खिडकीतून आत डोकावले असता त्यांना जयश्री यांचा मृतदेह घराच्या तुळईला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकत असल्याचे दिसले. ही घटना पाहिल्यानंतर महिलांनी आरडाओरडा केला. आत जाऊन पाहिले असता संजय यादव यांचाही मृतदेह आढळून आला, तर त्यांची दोन्ही मुले अंथरुणावरच निपचित पडल्याचे दिसून आले. ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यामुळे ग्रामस्थांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली. पोलीसपाटील पोपट तुकाराम साटपे यांनी इस्लामपूर पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस उपअधीक्षक वैशाली शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ राठोड पथकासह दाखल झाले. वैद्यकीय पथकाला बोलाविण्यात आले. यादव यांनी दोन्ही मुलांना गळा आवळून मारल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून संजय यादव यांनी लिहिलेली सावकारांच्या नावाची पाटी तसेच एक चिठ्ठी ताब्यात घेतली. श्रीमती शिंदे यांनी घटनेबाबत ग्रामस्थांकडून तपशीलवार माहिती घेत तपासकामी सूचना केल्या. (वार्ताहर) मित्र, नातेवाइकांना धक्का रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास सासूरवाडी पडवळवाडी येथे जाऊन संजय यादव यांनी सोयाबीनचे बियाणे आणले होते. तेथे नातेवाइकांशी मनमोकळेपणे बोलून ते परतले होते. थंडीचा कडाका वाढल्याने रविवारी रात्री दहापर्यंत शेकोटी करून ते मित्रांसमवेत शेकत बसले होते. मित्रांसोबत गप्पाही रंगल्या होत्या. ते असे कृत्य करतील, असे कोणालाही वाटले नव्हते. सकाळी ही घटना उघडकीस आल्यावर मित्रांचाही त्यावर विश्वास बसला नाही. नातेवाइकांनाही या घटनेचा धक्का बसला. पाटीवरील मजकूर... घटनास्थळी संजय यादव यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात पाटीवर चार सावकार आम्हाला मारणार आहेत, त्यांची चौकशी करावी, तर दुसऱ्या बाजूला पाटणकर आप्पा (बोरगाव) यांनी खूप त्रास दिला, असे नमूद केले आहे. दुसरी घटना : दहा वर्षांपूर्वी पत्नीला विषारी इंजेक्शन देऊन मारल्याचा गुन्हा संजय यादव यांच्यावर होता. त्यातून ते एक वर्षापूर्वी निर्दोष मुक्त झाले होते. सोमवारी घडलेल्या या घटनेने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.