शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मृतदेह विटंबना; आंबोळेंसह दोघेजण निलंबित

By admin | Published: November 05, 2014 11:58 PM

आयुक्तांची कारवाई : वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, मुकादमाची वेतनवाढ रोखली

सांगली : मिरजेत झालेल्या बेवारस मृतदेहांच्या विटंबनेप्रकरणी आज, बुधवारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे व सफाई कर्मचारी गोविंद मद्रासी या दोघांना आयुक्त अजिज कारचे यांनी निलंबित केले, तर वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक आर. के. यादव व मुकादम मिलिंद शिंदे यांची वेतनवाढ रोखण्यात आली. या चौघांवर कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मृतदेह विल्हेवाट लावण्यात पोलीस व सिव्हिल प्रशासनावरही ठपका ठेवला असून, त्याचा अहवाल संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला आहे. सांगलीतील दोन बेवारस मृतदेह पोलिसांनी महापालिका आरोग्य विभागाच्या मजुरांच्या ताब्यात अंत्यसंस्कारासाठी दिले होते. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कापडात गुंडाळून दिले जातात; मात्र बेवारस दोन्ही मृतदेह नग्नावस्थेत, शववाहिकेऐवजी कचरा उचलणाऱ्या गाडीतील कंटेनरमधून मिरजेतील पंढरपूर रोड स्मशानभूमीत आणण्यात आले. बेवारस मृतदेहांची विटंबना होते, याप्रकरणी महापालिकेवर टीकेची झोड उठल्यानंतर आयुक्तांनी प्रभारी उपायुक्त सुनील नाईक यांच्या अध्यक्षतेखालील समितीत सहाय्यक आयुक्त टीना गवळी, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, डॉ. रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक किशोर गोंधळेकर या पाच सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने सोमवारी सायंकाळी आपला सीलबंद अहवाल आयुक्तांना सादर केला होता. या अहवालात आरोग्य विभागाकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली असून, कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यांच्या निष्काळजीपणामुळे महापालिकेची बदनामी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याची दखल घेत आयुक्त कारचे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे व मृतदेहांची विल्हेवाट लावणारा सफाई कामगार गोविंद मद्रासी या दोघांना निलंबित केले. तरसेच वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक आर. के. यादव यांच्या दोन वेतनवाढी, तर मुकादम मिलिंद शिंदे यांची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)संघटना आक्रमकमृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी, त्याची सर्व पूर्तता पोलीस व सिव्हिल प्रशासनाने करावयाची आहे. या प्रकरणात सिव्हिलने विवस्त्र मृतदेह पालिकेच्या ताब्यात दिले. पोलिसांनी पंचनामा केला नाही, की दफनावेळीही ते हजर नव्हते. त्यामुळे केवळ पालिका कर्मचारी दोषी आहेत असे नव्हे, तर जबाबदारी पोलीस व सिव्हिलची आहे. त्यासाठी आता शुक्रवारी आयुक्त अजिज कारचे यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारणार असल्याचे कर्मचारी संघटनेचे नेते दिलीप शिंदे यांनी सांगितले. सांगली, मिरज पोलिसांतील फरकबेवारस मृतदेहाबाबत सांगली व मिरज पोलिसांतील फरकही अहवालात स्पष्ट करण्यात आला आहे. मिरजेतील पोलीस बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावताना महापालिकेला पत्र देऊन शववाहिकेची मागणी करतात. मृतदेहाचे दफन करेपर्यंत पोलीस कर्मचारी तेथे हजर असतो. सांगली शहर पोलीस ठाण्यातील कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडून पालिकेला पत्र दिले जाते. त्यात पालिकेने मृतदेहाची विल्हेवाट लावा, असे सांगून आपली जबाबदारी झटकली जात असल्याचे स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. पालिका कर्मचाऱ्यांची टोलवाटोलवीपोलिसांचे पत्र आयुक्तांनी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी आर. के यादव यांना दूरध्वनीवरून दोन मृतदेहांची विल्हेवाट लावण्यास सांगितले. यादव यांनी मुकादमाला, तर मुकादमाने सफाई कर्मचाऱ्याला दूरध्वनीवरूनच हा आदेश दिल्याचे अहवालात उघड झाल्याने या चौघांवर कारवाई करण्यात आली आहे.पोलीस, सिव्हिलकडून हेटाळणीबेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात पोलीस व सिव्हिल प्रशासनाचीही जबाबदारी असते. या दोन्ही मृतदेहांबाबत पोलीस व सिव्हिलकडूनही निष्काळजीपणा झाला आहे. सिव्हिल प्रशासनाने पालिका कर्मचाऱ्यांच्या ताब्यात मृतदेह देताना ते कापडात गुंडाळून दिले नाहीत. बेवारस मृतदेह ताब्यात घेऊन त्यांचे दफन करेपर्यंत पोलीस कर्मचारी हजर राहणे अनिवार्य आहे. मृतदेहाचा पंचनामा करून पोलिसांनी तो पालिका कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देणे अपेक्षित आहे; पण या प्रकरणावेळी एकही पोलीस कर्मचारी त्यांच्यासोबत नव्हता. पालिका कर्मचाऱ्यांनी याबाबत सिव्हिलकडे चौकशी केली असता, तुम्ही मृतदेह घेऊन जावा, पोलिसांना नंतर पाठवतो, असे सांगण्यात आले. त्यामुळे पोलीस व सिव्हिल प्रशासनाकडून निष्काळजीपणा झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसा अहवाल आयुक्तांनी जिल्हा पोलीस प्रमुख व सिव्हिलच्या अधिष्ठातांना पाठविला आहे. पोलीस, सिव्हिलकडून हेटाळणीबेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात पोलीस व सिव्हिल प्रशासनाचीही जबाबदारी असते. या दोन्ही मृतदेहांबाबत पोलीस व सिव्हिलकडूनही निष्काळजीपणा झाला आहे. सिव्हिल प्रशासनाने पालिका कर्मचाऱ्यांच्या ताब्यात मृतदेह देताना ते कापडात गुंडाळून दिले नाहीत. बेवारस मृतदेह ताब्यात घेऊन त्यांचे दफन करेपर्यंत पोलीस कर्मचारी हजर राहणे अनिवार्य आहे. मृतदेहाचा पंचनामा करून पोलिसांनी तो पालिका कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देणे अपेक्षित आहे; पण या प्रकरणावेळी एकही पोलीस कर्मचारी त्यांच्यासोबत नव्हता. पालिका कर्मचाऱ्यांनी याबाबत सिव्हिलकडे चौकशी केली असता, तुम्ही मृतदेह घेऊन जावा, पोलिसांना नंतर पाठवतो, असे सांगण्यात आले. त्यामुळे पोलीस व सिव्हिल प्रशासनाकडून निष्काळजीपणा झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसा अहवाल आयुक्तांनी जिल्हा पोलीस प्रमुख व सिव्हिलच्या अधिष्ठातांना पाठविला आहे.