शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

पलूसमधील पोषण आहारात मृत साप; ठेकेदारावर कारवाई करा, विश्वजित कदम यांनी सरकारला धरले धारेवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 6:24 PM

विधानसभा अध्यक्षांकडून कारवाईच्या सूचना

कडेगाव : पलूस येथील कृषीनगरच्या अंगणवाडी क्रमांक ११६ मधील शालेय पोषण आहारात सापाचे मृत पिल्लू सापडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी याबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरले. ठेकेदार कंपनीची चौकशी करून कारवाईची मागणी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला याप्रश्नी कारवाईच्या सूचना केल्या.कदम म्हणाले, पाेषण आहाराबाबत सातत्याने तक्रारी आहेत. पाेषण आहारात सापाचे मृत पिल्लू सापडणे, हा गंभीर प्रकार आहे. यामुळे गरोदर माता, तसेच लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा प्रकारामुळे आपण त्या मुलांच्या व मातांच्या आयुष्याशी खेळतोय का? असा प्रश्न निर्माण हाेत आहे. यापूर्वी पोषण आहाराच्या रूपात हरभरा, तांदूळ, तिखट, डाळी, असा कच्चा माल दिला जात असे.परंतु, नवीन धोरणानुसार सर्व एकत्रित केलेला पॅक माल पुरविला जातो, हा माल पुरवण्याचा संपूर्ण राज्याचा ठेका एकाच कंपनीकडे आहे. त्यामुळे ते हा माल प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात किंवा अंगणवाडीत आल्यानंतर त्याची तपासणी होते का? दोन महिन्याचा माल एकाच दिवशी दिला जातो; पण तो पॅक माल दोन महिने राहतो का? असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी सरकारला धारेवर धरले. याबाबत शासनाने गंभीर दखल घ्यावी. या संपूर्ण प्रकरणामध्ये दोषी असणारे अधिकारी, कंपनी, ठेकेदार व अन्य कोणी यांची सखोल चौकशी करून कडक कारवाई करावी.

प्रकरण गंभीर : राहुल नार्वेकरविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, विधिमंडळाचे सदस्य विश्वजित कदम यांनी सभागृहास दिलेली माहिती अतिशय गंभीर असून, शासनाने त्याची दखल घेऊन याेग्य ती कारवाई करावी.

टॅग्स :Sangliसांगलीvidhan sabhaविधानसभाVishwajeet Kadamविश्वजीत कदमSchoolशाळा