सांगली : जिल्ह्यातील चार लाख ३६ हजार ६१५ पात्र लाभार्थ्यांपैकी दोन लाख ६७ हजार ७१० लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. उर्वरित एक लाख ६८ हजार ९०५ लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. या लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली आहे.डॉ. दयानिधी म्हणाले की, केंद्र शासनाकडील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पी.एम. किसान पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यानसाठी विशेष जनजागृती मोहीम सुरू आहे. पी.एम. किसान योजनेतून वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपये लाभार्थ्यांना मिळत आहेत. हे हप्तेे पुढे चालू ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करण्याची गरज आहे. यासाठी केंद्र शासनाने दि. ३१ ऑगस्ट २०२२ ही मुदत दिली होती.या मुदतीमध्येही सांगली जिल्ह्यात एक लाख ६८ हजार लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही. म्हणूनच शासनाने पुन्हा ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना दि.७ सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीमध्ये शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही तर शेतकऱ्यांचे शासनाकडून मिळणारे सहा हजारांचे तिन्ही हप्ते बंद होणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तालुकानिहाय लाभार्थी संख्यातालुका एकूण लाभार्थी ई-केवायसी नसलेलेआटपाडी ३१९३४ १४१७०जत ७३६६२ २५१४३कडेगांव ३६९१९ १४०६०कवठेमहांकाळ ३०५६२ १२३९७खानापूर २७१३५ १३२२६मिरज ५७८९६ २४९९९पलुस २५६७२ १०००७शिराळा ३७९१९ १२३८६तासगांव ४४४६१ १७०९०वाळवा ७०४५५ २५४२७