माडग्याळ : शिक्षक मुलाच्या निलंबनाची बातमी वाचून वडिलांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना विद्यानगर जत येथे घडली.
शिवाजी विठ्ठलराव जाधव हे जत येथील प्राथमिक मराठी शाळा नंबर २ येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्यात व तेथील अन्य कर्मचाऱ्यांमधील वादाच्या प्रकरणीची जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशी केली. त्यानंतर शिवाजी जाधव यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी निलबंनाची कारवाई केली.
ही बातमी जाधव यांचे वडील विठ्ठलराव जाधव यांनी वर्तमानपत्रांतून वाचली. त्याचा धक्का बसून त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. विठ्ठलराव जाधव हे जुन्या काळातील ज्योतिषकार होते. ते वास्तुशास्त्राचे अभ्यासकही होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.