शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

बेळंकीत कालव्यात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:15 PM

सलगरे : बेळंकी (ता. मिरज) येथील गंगाटेक परिसरात म्हैसाळ योजनेच्या कालव्यात पोहण्यास गेलेल्या राजाराम मऱ्याप्पा जाधव (वय ५०) व ...

सलगरे : बेळंकी (ता. मिरज) येथील गंगाटेक परिसरात म्हैसाळ योजनेच्या कालव्यात पोहण्यास गेलेल्या राजाराम मऱ्याप्पा जाधव (वय ५०) व श्रेयस (१४) या पिता-पुत्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर त्यांच्या दुसºया मुलास जवळच असलेल्या क्रशरवरील कामगारांनी वाचविले. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजता घडली.बेळंकी येथील निवृत्त सैनिक राजाराम जाधव हे आपली दोन मुले श्रेयस, अथर्व (वय १०) व अंकली येथील नातेवाईकांचा मुलगा मनोज गाडीवडर (७) यांच्यासह बेळंकी येथील म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यात पोहण्यासाठी आले होते. दुपारी चार वाजता ते श्रेयस व अथर्व यांच्यासोबत मुख्य कालव्यात पायºया असलेल्या ठिकाणी पोहण्यासाठी उतरले, तर नातेवाईकांचा सात वर्षाचा मुलगा मनोज कालव्याच्या काठावरच थांबला होता.सध्या म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने कालव्यात लांडगेवाडी येथील टप्प्यातून पाण्याचा मोठा प्रवाह सुरू आहे. या वाहत्या पाण्यात त्यांना पोहता येईना. मुले प्रवाहाने ओढली जाऊ लागली. हे लक्षात येताच राजाराम त्यांना घेऊन पाण्याबाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. याचवेळी एका हाताने अंशात्मक दिव्यांग असलेल्या श्रेयसने त्यांना पकडले. त्यामुळे राजाराम यांना पाण्याबाहेर पडता येईना. प्रवाहाची गती त्यांना पुढे ढकलत होती. त्यामुळे त्यांनी आरडाओरड सुरू केली. हा प्रकार पाहून कालव्याच्या काठावर असलेल्या मनोजने आक्रोश केला.बुडत असलेल्या बाप-लेकाच्या सोबत तो कालव्याच्या काठावरून तब्बल दीड किलोमीटरपर्यंत ‘वाचवा वाचवा’ असे ओरडत पळत होता. यादरम्यान कालव्यालगत असणाºया एका क्रशरवरील कामगार सुटी करून कालव्याजवळून जात होते. त्यांनी हा प्रकार पाहून मदतीसाठी धाव घेतली. एक लांब काठी घेऊन तिघांनाही पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण केवळ अथर्वच त्यांच्या हाती लागला. राजाराम व श्रेयस यांची हालचाल कमी झाली होती. दोघेही प्रवाहाबरोबर आणखी पुढे जाऊ लागले. काही अंतरावर राजाराम यांना बाहेर काढण्यात यश आले, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. श्रेयस तसाच पुढे वाहत गेला. सुमारे तीन किलोमीटर अंतरावर डोंगरवाडी प्रकल्पाजवळ काही तरुणांनी धाडसाने पाण्यात उडी घेऊन त्याला बाहेर काढले. पण तोपर्यंत त्याचाही मृत्यू झाला होता.दरम्यान, वाचलेल्या अथर्वला बेळंकी येथील ग्रामस्थांनी खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार केले. त्याची प्रकृती स्थिर असून त्याला सायंकाळी घरी सोडण्यात आले.राजाराम हे माजी सैनिक होते. आठ वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले होते. त्यांच्या पत्नी सुनीता या गुंडेवाडी (ता. मिरज) येथे ग्रामसेविका आहेत. घटनेची माहिती पोलीस-पाटील चंद्रकांत पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती.भोसेत कालव्यात बुडून वृध्दाचा मृत्यूभोसे (ता. मिरज) येथे कालव्याच्या पाण्यात पडून बुडाल्याने तुकाराम रामचंद्र बन्ने (वय ६१, रा. भोसे) यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली. तुकाराम बन्ने हे भोसेतील बनसारी ओढ्याजवळ डोंगरवाडी योजनेच्या कालव्याच्या परिसरात म्हैस चारण्यासाठी घेऊन गेले होते. म्हैशीचा कासरा त्यांनी आपल्या हाताला गुंडाळला होता. पाणी पाहून म्हैस कालव्यात धावत गेल्याने म्हैशीपाठोपाठ तेही कालव्यात खेचले गेले. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थांनी पाण्यातून बाहेर काढून त्यांना मिरज शासकीय रुग्णालयात आणले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.