नोंदणी फीवरून संभ्रम : अर्जाची प्रक्रिया सुटसुटीत करण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कर्जमाफीचा अर्ज आॅनलाईन भरावयाचा असल्यामुळे पुन्हा गोंधळ होण्याची चिन्हे दिसत आहेत. एकीकडे ई-सेवा केंद्रांकडून जादा नोंदणी फी घेण्याचे प्रकार घडत असताना, शेतकरी नेत्यांनीही याबाबत विरोधाची भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुटसुटीत करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.कर्जमाफीसाठी आवश्यक असणाºया अर्जाचा तथा घोषणापत्राचा नमुना राज्य शासनाने पाठविला आहे. कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकºयाला संबंधित गावातील किंवा गावाजवळील ई- सेवा केंद्रात आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाचा आहे. त्यामुळे याबाबत वाद निर्माण झाले आहेत. जिल्ह्यातील काही सेवा केंद्रांनी शेतकºयांकडून शंभर रुपये भरून घेण्यास सुरुवात केल्याच्या तक्रारी येत आहेत. जिल्हा उपनिबंधकांनीही याची गंभीर दखल घेत, शेतकºयांना यासंदर्भात तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. सेवा केंद्रांना शासन शुल्क देणार असल्याने, त्यांनी पैसे मागितले, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनीही या आॅनलाईन प्रक्रियेला विरोध केल्यामुळे आता आणखी गोंधळ निर्माण झाला आहे. शेतकºयांमधील संभ्रमावस्था दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच या गोष्टींमुळे बाधा येत आहे. जिल्हा बँकेने नेमक्या याच अडचणींवर मात करीत शेतकºयांना मदत करण्याची भूमिका स्वीकारली आहे. शेतकºयांना या गोष्टीची अडचण निर्माण होऊ नये म्हणून, अर्ज लेखी स्वरुपात भरून तो शेतकºयाकडे सुपूर्द केला जाणार आहे. त्यानंतर संबंधित शेतकºयाने सेवा केंद्रात तो अर्ज नेल्यानंतर केंद्र चालकास सहजपणे तो अर्ज भरता येईल.शेतकºयांना मदत करण्याची सूचनाबँकेने कर्जमाफीच्या योजनेत शेतकºयांना सहकार्याच्या भावनेतून ही जबाबदारी स्वत:हून उचलली आहे. यासंदर्भात शेतकºयांना आवश्यक ती सर्व माहिती देऊन मदत करण्याची सूचना संबंधित शाखाप्रमुख, कर्मचारी यांना दिली आहे. जिल्हा बॅँकेतही यासाठी माहिती कक्ष सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रशासकीय प्रक्रियेत कुठेही अडथळा निर्माण होऊ नये, शेतकºयांना ही प्रक्रिया अडचणीची वाटू नये म्हणून प्रयत्न सुरू झाले आहेत.
सांगलीत कर्जमाफीच्या आॅनलाईन अर्जामुळे वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:10 AM
सांगली : कर्जमाफीचा अर्ज आॅनलाईन भरावयाचा असल्यामुळे पुन्हा गोंधळ होण्याची चिन्हे दिसत आहेत. एकीकडे ई-सेवा केंद्रांकडून जादा नोंदणी फी घेण्याचे प्रकार घडत असताना, शेतकरी नेत्यांनीही याबाबत विरोधाची भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुटसुटीत करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.
ठळक मुद्दे♦प्रक्रिया अडचणीची वाटू नये म्हणून प्रयत्न सुरू झाले ♦शेतकºयांना मदत करण्याची सूचना♦पैसे मागितले, तर त्यांच्यावर कारवाई ♦ अर्ज भरण्याची प्रक्रिया सुटसुटीत करण्याची मागणी