सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत बुधवारी घट होताना, नवीन ४०३ रुग्ण आढळले, तर परजिल्ह्यातील चारजणांसह जिल्ह्यातील १८ अशा २२ जणांचा मृत्यू झाला. ७६१ जण कोरोनामुक्त झाले, तर म्युकरमायकोसिसचा एक नवीन रुग्ण आढळला.
जिल्ह्यातील १८ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगलीचे ४, मिरज २, कवठेमहांकाळ, वाळवा आणि मिरज तालुक्यातील प्रत्येकी ३, जत, खानापूर, तासगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
आरोग्य यंत्रणेने केलेल्या आरटीपीसीआरअंतर्गत ४२३० जणांच्या नमुने तपासणीतून १८३ जण बाधित आढळले, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ७१८० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात २३६ बाधित आढळले.
उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत घट झाली असून सध्या ५११० जण उपचार घेत आहेत. यातील ७०४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५७८ जण ऑक्सिजनवर, तर १२६ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील चौघांचा मृत्यू झाला, तर नवीन १६ जण उपचारास दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १८६५६३
उपचार घेत असलेले ५११०
कोरोनामुक्त झालेले १७६५४०
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४९१३
बुधवारी दिवसभरात
सांगली ४५
मिरज १०
आटपाडी २१
कडेगाव ४१
खानापूर ३७
पलूस १५
तासगाव ५५
जत ३०
कवठेमहांकाळ ५१
मिरज तालुका ५०
शिराळा १४
वाळवा ३४