फोटो ०६ संतोष ०२ - मोदक हार
फोटो ०६ संतोष ०३ - कमळ
फोटो ०६ संतोष ०४ - गळ्यातील हार
फोटो ०६ संतोष ०५ - मोदकांचा नैवेद्य
फोटो ०६ संतोष ०६ - तोडे
फोटो ०६ संतोष ०७ - उंदीरमामा
फोटो ०६ संतोष ०८ - त्रिशूल
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : बाप्पाच्या सजावटीसाठी सराफ पेठेनेही तयारी सुरू केली आहे. त्याची श्रीमंती वाढविण्यासाठी हरतऱ्हेच्या कल्पक दागिन्यांची शृंखला उपलब्ध केली आहे.
बाप्पा अधिकाधिक श्रीमंत दिसण्यासाठी मंडळांची स्पर्धा सुरू असते. सांगली-मिरजेतील मंडळांच्या गणपतींची श्रीमंती दरवर्षी वाढत आहे. दरवर्षी दागिन्यांमध्ये भर घालून बाप्पाला अधिकाधिक खुलविण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न असतो. नवसाच्या समजल्या जाणाऱ्या गणपतींना भाविकांकडूनही दागिन्यांचे दान मिळते. ही श्रद्धा ध्यानात घेऊन सराफ पेठेने तऱ्हतऱ्हेचे दागिने उपलब्ध केले आहेत. नाजूक घडणावळीचे आणि कल्पक डिझाइनचे दागिने लक्ष वेधून घेत आहेत. काही दागिने सोन्या-चांदीपासून घडवले आहेत. भाविकांना परवडण्यासाठी सोन्या-चांदीचे पाणी दिलेले दागिनेही उपलब्ध आहेत.
चौकट
सोन्या-चांदीची आभूषणे
दुर्वा, मोदक, गदा, सोंड, कान आणि हात, पाय, कमळाची फुले, केळीचे खुंट, केळीची फणी, किरीट, जानवे, मोदक हार, जास्वंदीचा आणि दुर्वांचा हार, केवडा, चाफ्याचा हार, तोडे, उंदीरमामा, त्रिशूळ आदी वस्तू सोन्या-चांदीपासून तयार केल्या आहेत. घरगुती आणि मंडळांच्या उत्सवासाठी त्यांचे आकार वेगवेगळे आहेत. त्यांच्या किमती ३०० रुपयांपासून पुढे आहेत.
कोट
गणेशोत्सवासाठी अनेक कल्पक दागिने सराफ पेठेत आले आहेत. मंडळांकडून त्यांना मागणीही आहे. यंदा मूर्तींची उंची कमी असल्याने हार किंवा दागिन्यांचे आकारही कमी झाले आहेत. घरगुती उत्सवासाठी पूजा साहित्य, आरतीचे ताट अशा सोन्या-चांदीच्या वस्तूंना मागणी आहे.
- पंढरीनाथ माने, सराफ असोसिएशन