वाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या शतकमहोत्सवी जयंती प्रारंभ दिनी गुरुवारी वाळवा ग्रामपंचायतीतर्फे राबविलेल्या कोटींच्या विविध विकास कामांचे लोकार्पण सरपंच डॉ. शुभांगी माळी व हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायतीतर्फे ग्रामसचिवालय समोरच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
गौरव नायकवडी म्हणाले, ग्रामपंचायत माध्यमातून पेव्हर ब्लाॅक, आर सी सी गटर, रस्ते खडीकरण व मुरमीकरण, सौरदिवे, आर सी सी रस्ते, ग्रामपंचायत इमारत नूतनीकरण, वैयक्तिक लाभार्थी प्रकरणे, रस्ता डांबरीकरण इत्यादी अनेक कामे केली आहेत. या सर्व कोट्यवधी रुपये खर्च करून पूर्ण केलेल्या विविध प्रकारच्या विकास कामांचे लोकार्पण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांच्या शतकमहोत्सवी जयंती प्रारंभ दिनी करण्यात आले आहे, याचा सर्वांना आनंद होत आहे.
सरपंच डॉ. शुभांगी माळी म्हणाल्या, चौदाव्या वित्त आयोगातून गावात मोठ्या प्रमाणावर विकास कामे राबवून गावचा कायापालट केला आहे. आणखी काही अडचणी असल्यास थेट ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा.
यावेळी उपसरपंच पोपट अहिर, इसाक वलांडकर, आशा कदम, अभियंता व्ही. डी. वाजे, सुजित घोरपडे, सुमन कांबळे, संदेश कांबळे, डॉ. अशोक माळी, विलास थोरात, मानाजी सापकर, उमेश घोरपडे, राजेंद्र साळुंखे उपस्थित होते.