आष्टा : कोरोनाकाळामध्ये संजीवनी हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. दीपक पाटील यांनी रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाइकांना मोठा आधार दिला आहे. कोरोना रुग्णावर मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा केली आहे, असे प्रतिपादन वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील यांनी केले.
पोखर्णी, ता. वाळवा येथील अशोका ॲग्रो उद्योग समूहाचे संचालक डॉ. सतीश पाटील व वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील यांच्या हस्ते डॉ. दीपक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते.
यावेळी संजीवनी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. स्वाती पाटील, डॉ. स्मिता पाटील, आनंदराव पाटील, सचिन पाटील, मोहन पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विश्वनाथ जाधव उपस्थित होते.
डॉ. सतीश पाटील म्हणाले, कोरोनाच्या संकट काळामध्ये डॉ. दीपक पाटील यांचे संजीवनी हॉस्पिटल म्हणजे गोरगरीब गरजू रुग्णांसाठी मोठा आधार आहे. कोविड रुग्णांवरती मोफत उपचार केले जातात. समाजसेवेची शिक्षण गंगा सर्वसामान्यांच्या दारी आणण्याचे काम डॉ. दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, बीएससी नर्सिंग कॉलेज आणि जी. एन. एम. कॉलेज यासारख्या व्यावसायिक शिक्षण उपक्रमातून अव्याहतपणे चालू ठेवली आहे.
फोटो : डॉ. दीपक पाटील यांचा सत्कार करताना अशोका ॲग्रोचे संचालक डॉ. सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुभाष पाटील, डॉ. स्वाती पाटील, डॉ. स्मिता पाटील, आनंदराव पाटील, सचिन पाटील, मोहन पाटील, माजी मुख्याध्यापक विश्वनाथ जाधव आदी उपस्थित होते.