इस्लामपूर : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सांगलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी दीपाली काळे यांना सहआरोपी करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी केले.जाधव म्हणाले, अनिकेत कोथळेच्या खुनाच्या घटनेची माहिती काळे यांना होती. ज्या रात्री कोथळे यांना मारहाण झाली, त्या रात्री काळे कुठे होत्या? त्या गप्प का राहिल्या? त्याही युवराज कामटेसह या घटनेत सहभागी आहेत. युवराज कामटेसह काळे यांनाही सहआरोपी करून अनिकेत कोथळे याच्या घरच्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जाधव यांनी केली आहे. काळे यांच्यावर कारवाई झाली नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.. बड्या नेत्याच्या कृपेने कॉपी प्रकरण दडपले...मागील एका प्रकरणाबाबत बोलताना जाधव म्हणाले, फेब्रुवारी २0१७ मध्ये झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये दीपाली काळे यांनी आपल्या मुलाला इस्लामपूर येथे एका महाविद्यालयात कॉपी पुरविण्याचा प्रताप केला होता. हा प्रकार उघडकीसही आला. पण त्यांनी नुकत्याच उदयास आलेल्या एका बड्या नेत्याच्या माध्यमातून आपली सुटका करवून घेतली. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज विद्यापीठाकडे व कॉलेजकडे उपलब्ध आहे. परंतु त्यांंनी आपल्या अधिकाराच्या जोरावर सर्व काही मॅनेज करुन टाकले. या घटनेची साधी चौकशीही झाली नाही
दीपाली काळेंना सहआरोपी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:51 PM