ते म्हणाले, कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून व्यापार, उद्योग पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे व्यापारी आणि उद्योजकांसोबत त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या हजारो कामगारांची आर्थिक कुचंबणा झाली आहे. शासनाने कामगारांना काहीही मदत केलेली नाही. सध्याचा लॉकडाऊन पूर्णतः चुकीचा आहे. महापालिका क्षेत्राचा पॉझिटिव्हिटी रेट कमी असताना, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट धरून लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही लॉकडाऊनबाबत योग्य निर्णय घ्यावा.
लसीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात अपयश आले आहे. अनेक ठिकाणी गर्दी होणारे व्यवसाय सुरू आहेत. प्रशासनाने कामगारांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता त्वरित लॉकडाऊन रद्द करावा, अन्यथा हजारो कामगारांना घेऊन रस्त्यावर उतरून भाजप कामगार आघाडीच्यातीने ''सविनय लॉकडाऊन भंग'' आंदोलन करणार असल्याचा इशारा शिंदे यांनी दिला. यावेळी कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश मोहिते, नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रियानंद कांबळे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, राहुल ढोपे-पाटील, गजानन मोरे, जय खाडे, सुमित शिंगे उपस्थित होते.