शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांवर शासनाकडून जाणीवपूर्वक अन्याय - रावसाहेब पाटील 

By अशोक डोंबाळे | Published: March 02, 2023 4:22 PM

शिक्षकांवरील अन्यायाविरोधात राज्यभर आंदोलन छेडणार

सांगली : गेल्या २० वर्षांपासून बिनपगारी काम करणाऱ्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना शासनाने जाणीवपूर्वक अनुदानापासून वंचित ठेवले आहे. या शिक्षकांवरील अन्यायाविरोधात राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिला आहे. तसेच शासनाने २१ फेब्रुवारीचे पत्र तातडीने मागे घ्यावे, अशी मागणीही पाटील यांनी केली.रावसाहेब पाटील म्हणाले की, गेली १५ ते २० वर्षे बिनपगारी काम करणाऱ्या अघोषित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना वेतन अनुदान सुरू करण्यासाठी शासनस्तरावरून पूर्णता दुर्लक्ष होत आहे. अनुदानास पात्र घोषित यादी निश्चित करण्यासाठी दि. ६ फेब्रुवारी २०२३ चा शासन निर्णयात आणि शिक्षण आयुक्त यांचे १७ फेब्रुवारी २०२३ च्या पत्रात अनेक जाचक व अन्यायकारक अटी लादल्या आहेत. त्यांची पूर्तता करण्याचा आदेश दिला आहे. पुन्हा अशा अन्यायकारक जाचक अटी व शर्ती लादून शासन विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकावर जाणीवपूर्वक अन्याय केला आहे. शासन निर्णय दि. ६ फेब्रुवारी २०२३ व शिक्षण आयुक्त यांचे दि. १७ फेब्रुवारी २०२३ चे पत्र आणि शिक्षण संचालक यांचे याबाबतचे दि. २१ फेब्रुवारी २०२३ चे पत्र तातडीने मागे घेऊन सरसकट अघोषित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांना शंभर टक्के अनुदानित पगार सुरू करण्याची गरज आहे. विनाअनुदानित शिक्षकांची चेष्टा तातडीने थांबवावी, अन्यथा राज्यभर सर्व शिक्षण संस्था चालक आणि शिक्षक आंदोलन करतील, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.तपासणीच्या नावाखाली चालढकल बंद कराविनाअनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करून अनुदान देण्याची शासनाने घोषणा केली आहे; पण वारंवार तपासणीच्या नावाखाली शासन चालढकल करीत आहे. हा प्रकार तातडीने थांबवावा, अन्यथा आंदोलन करण्याशिवाय शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षकांकडे कोणताही पर्याय राहिला नाही, असा इशाराही रावसाहेब पाटील यांनी दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षकSchoolशाळा