यंत्राद्वारे बेसुमार वाळू उपसा होत असल्याने ओढापात्रालगत असणाऱ्या शेतातील विहिरींच्या पाणीपातळीत कमालीची घट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या वाळू तस्करांना रोखण्यासाठी शेतकरी गेले असता, त्यांना धमकावण्यात येत असून, प्रशासनाने रात्रीच्यावेळी होणारी वाळू तस्करी थांबविण्याची मागणी होत आहे. मध्यंतरी तत्कालीन तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी वाळू तस्करांवर कडक कारवाई केली होती; मात्र त्यांच्या बदलीनंतर वाळू तस्कर पुन्हा सक्रिय झाले आहेत. रोज अनेक डंपर गाड्या जेसीबीने भरून जात आहेत. मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत आहे. केवळ तलाठी व कोतवाल यांच्यावर जबाबदारी सोपवून वाळू तस्करी थांबत नाही, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पोलीस बंदोबस्तात वाळू तस्करी रोखावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
करजगी वाळू तस्करांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:27 AM