कोकळे येथील धरणमळा परिसरातील रस्ता ओढ्याच्या पात्रातून जातो. या ओढा पात्रामध्ये वाळू माफियांनी रस्ता तोडून वाळू उपसा केला आहे. वाळू उपशासाठी मशीनच्या साहायाने रस्त्यावर दहा ते पंधरा फुटाचे खड्डे खोदले आहेत. नागरिकांना येण्या-जाण्यासाठी रस्ता पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे ४०० ते ५०० नागरिकांचा संपर्क तुटला आहे. तेथील लोकांचे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे या भागात ओढा पात्रामध्ये लोकवर्गणीतून रस्ता मुरुमीकरणाचे काम केले होते. तो मुरुमही वाळू माफियांनी चोरुन नेला आहे. याबाबत ग्रामपंचायत, तहसीलदार यांना लेखी कळवले होते. त्यानंतर तलाठ्यांनी रस्त्याचा पंचनामा केला. तरीसुद्धा प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे लोकशाहीच्या मार्गाने कोकळे येथे १४ डिसेंबर रोजी कवठेमहांकाळ-जत मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
यावेळी देवाजी ओलेकर, तानाजी कांबळे, शांताराम बोलते, महादेव साळुंखे, चंद्रकांत ओलेकर, चंद्रकांत खळेकर, नारायण मूर्ती, सतीश मोहिते, संदीप सगरे, नीलेश ओलेकर, आदित्य ओलेकर, दिलीप कदम आदी उपस्थित होते.
फोटो-०७कवठेमहांकाळ०२
फोटो ओळ : कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथील वाळू तस्करांवर कारवाईच्या मागणीचे निवदेन ग्रामस्थांनी तहसीलदार बी. जे. गोरे यांना दिले.