निवेदनात म्हटले आहे की ‘काही विघ्नसंतोषी लोकांनी महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या फेसबुक पेजवरील माहितीची चोरी करून त्यामध्ये मोडतोड करून विनापरवाना वापर केला आहे. अन्य साेशल मीडियावरून ही माहिती प्रसारित केली आहे. जाणीवपूर्वक कुस्ती मल्लविद्या महासंघाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. महासंघाच्या बदनामीस कारणीभूत ठरवून अनिल पाटील व रामदास देसाई यांच्यावर सायबर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी कुस्ती मल्लविद्या महासंघाचे मार्गदर्शक भाऊसाहेब पाटील, मिथुन वाघमारे, अभिजित शिंदे, हणमंत निकम, प्रकाश पाटील, योगेश वाघमारे, नारायण चंदनशिवे, धनाजी चंदनशिवे, रणजित खुटाळे, गणेश टिंगरे, आरीफ मुलाणी, बसवेश्वर बुरकुल, नाशीर मणेरसह महासंघाचे सदस्य उपस्थित होते.
फोटो : २३ घाटनांद्रे १
ओळी : पोलीस उपनिरीक्षक शिवाजी करे यांना प्रा. भाऊसाहेब पाटील, मिथुन वाघमारे, अभिजित शिंदे यांनी निवेदन दिले.