शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

भिडे, एकबोटेंच्या अटकेचे धाडस दाखवा संभाजी ब्रिगेडची मागणी : कोरेगाव-भीमा येथील घटनेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 1:04 AM

सांगली : कोरेगाव-भीमा येथील दंगलप्रकरणी संभाजीराव भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याचे धाडस प्रशासनाने दाखवावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.पत्रकात म्हटले आहे की, कोरेगाव-भीमा व वढू-बुद्रुकमध्ये झालेल्या जातीय हिंसाचाराचा संभाजी ब्रिगेड निषेध करीत आहे. छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल ब्रिगेडला आदर आहे. मनोहर (संभाजीराव) भिडे ...

सांगली : कोरेगाव-भीमा येथील दंगलप्रकरणी संभाजीराव भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याचे धाडस प्रशासनाने दाखवावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, कोरेगाव-भीमा व वढू-बुद्रुकमध्ये झालेल्या जातीय हिंसाचाराचा संभाजी ब्रिगेड निषेध करीत आहे. छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल ब्रिगेडला आदर आहे. मनोहर (संभाजीराव) भिडे व मिलिंद एकबोटे यांनी संपूर्ण महाराष्टÑात इतिहासाची मोडतोड करुन मराठा समाजाच्या तरुणांची माथी भडकावण्याचा उद्योग केल्याने दंगलसद्दश परिस्थिती निर्माण झाली, हे कोणीही नाकारु शकत नाही.

शिवशाहीच्या हुंकारातून पेशवाईचा जीर्णोद्धार करण्याचा महाराष्टÑात व देशामध्ये जो प्रयोग सुरू आहे, त्याचा ब्रिगेड निषेध करीत आहे. शिवरायांना अपेक्षित असणारे अठरापगड जातीचे समतावादी शिवस्वराज्य उभारणीसाठी तसेच मराठा-दलित आणि हिंदू-मुस्लिम सलोख्यासाठी ब्रिगेडचा प्रयत्न राहील. मराठा सेवा संघाच्या प्रबोधनामुळे मराठा व बहुजनांची मुले आता खरा इतिहास वाचू लागली आहेत.

पत्रकारवर जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर, कार्याध्यक्ष प्रणव भोसले, कोषाध्यक्ष गणेश देसाई, सचिव बाळासाहेब लिपाणे-पाटील, कायदा सल्लागार डॉ. महेश पाटील यांच्या सह्या आहेत.जनतेचा विश्वास उडाला..अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असलेले संशयित प्रसारमाध्यमांना बेधडक मुलाखती देत आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिसप्रमुख त्यांच्यासमोर हात जोडत आहेत. तरीही गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री संशयितांना अटक करण्याचे धाडस दाखवित नाहीत. त्यामुळे घटनेप्रमाणे राज्य चाललंय यावर जनतेचा विश्वास उडाला आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.