लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : एक तर सगळी दुकाने उघडण्यास परवानगी द्या, नाहीतर आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करा, अशी मागणी शहरातील संतप्त व्यापाऱ्यांनी तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे मंगळवारी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी निदर्शनेही केली.
व्यापाऱ्यांनी गांधी चौकातून रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ येऊन आंदोलन केले. एक तर सगळी दुकाने उघडावीत नाही तर पूर्ण आठ दिवस कडक लॉकडाऊन करावे, असे निवेदन तहसीलदार सबनीस यांना दिले.
यावेळी मोहन पाटील, कपिल ओसवाल, विक्रम घाडगे, उमेश कुरळपकर, विजय कारंजकर, तुलसीदास पटेल, दिनेश पोरवाल, विकास राजमाने, राजेंद्र ढबू, विजय पवार, प्रकाश जैन, संभाजी कुशिरे, सुनील तेवरे, उदय इटकरकर, सागर निकम, अमर कोकाटे, अनुज आगरवाल, अभय शहा, गौरव शहा, गौतम रायगांधी, संजय ओसवाल, राजकुमार ओसवाल उपस्थित होते.
फोटो : इस्लामपूर शहरातील व्यापाऱ्यांनी तहसील कार्यालयावर रॅली काढत दुकाने सुरू करण्याची मागणी केली. यावेळी कपिल ओसवाल, मोहन पाटील, गौतम रायगांधी, विक्रम घाडगे, विजय कारंजकर सहभागी झाले होते.