सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली परिसरात करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने सकारात्मक अहवाल दिलेला असतानाही, कुलगुरू देवानंद शिंदे यांनी खानापूरची जागा रेटण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे कुलगुरू हटाव, विद्यापीठ बचाव आंदोलन हाती घेणार असल्याचे विद्यार्थी संघटनांच्यावतीने सुधार समितीचे निमंत्रक अॅड. अमित शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत सांगितले. याबाबत राज्यपालांकडे पुराव्यानिशी तक्रारी केल्या असून याची दखल न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही शिंदे यांनी दिला आहे.अॅड. शिंदे म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू शिंदे यांच्याबाबत ‘सुटा’ या संघटनेने पुराव्यानिशी अनेक तक्रारी राज्यपालांकडे केल्या आहेत. विद्यापीठाचे उपक्रेंद्र सांगलीत व्हावे यासाठी सुधार समिती आणि अन्य संघटना गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनीही तसा विद्यापीठाला प्रस्ताव पाठविलेला असताना, कुलगुरूंनी खानापूरचा प्रस्ताव रेटला आहे. विद्यापीठातील निर्माण झालेल्या सर्व शैक्षणिक प्रश्नांना कुलगुरूच जबाबदार आहेत. विद्यापीठाची पदवी एकाच सहीने असल्याचे आदेश असताना, कुलगुरुंनी दोन स'ांचे पदवी प्रमाणपत्र काढून खर्च वाढविला. कुलगुरुंनी शिक्षण सल्लागार म्हणून एका व्यक्तीची नियुक्ती केली आहे. शिवाजी विद्यापीठात संशोधनाऐवजी कार्यालये नूतनीकरणावर लाखो रुपये खर्च केले जात आहेत. एकेका खोलीत पाच-पाच विद्यार्थी कोंबले आहेत. कुलगुरुंनी स्वत:ची खासगी बिले काही ठेकेदाराकडून भरून घेतल्याच्याही तक्रारी आहेत. लाखो रुपयांचा गॉगल कुलगुरुंकडे आला कोठून? विद्यापीठातील सर्व गैरकारभाराला कुलगुरुच जबाबदार आहेत. त्यांची तात्काळ बदली करा, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी सचिन सव्वाखंडे, तेजस नांद्रेकर, शिवाजी त्रिमुखे, शुभम जाधव, गौरव घाडगे, शुभम ठोंबरे, जयंत जाधव आदी उपस्थित होते.विद्यापीठ उपकेंद्रप्रश्नी भूमिका स्पष्ट करावीलोकसभा निवडणुकीमध्ये विद्यार्थी, युवकांचे मतदान मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी विद्यापीठ उपकेंद्राबाबत भूमिका करावी. उपकेंद्राला पाठिंबा देणाऱ्या उमेदवारांचा संघटनेकडून विचार केला जाईल, असेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कुलगुरू देवानंद शिंदेंना हटविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 12:13 AM