ते म्हणाले, कोरोना साथीने थैमान घातले आहे. कुपवाड शहर एमआयडीसी व लगतच्या परिसरात सर्वसामान्य नागरिक, कामगारांना परवडणारी अशी कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही. तसे हॉस्पिटलदेखील नाही. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्याने त्यांची हेळसांड होत आहे. त्यासाठी महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या साठ गुंठे खुल्या भूखंडावर हॉस्पिटल उभारणे आवश्यक आहे. हा भूखंड महापालिकेच्या मालकीचा आहे. या भूखंडावर हॉस्पिटल उभारण्यासाठी सात कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
पालकमंत्री पाटील यांनी या संदर्भातील प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या आहेत. या ठिकाणी हॉस्पिटल झाल्यास कुपवाड शहर, एमआयडीसीलगतच्या परिसरातील सर्वसामान्य गरीब नागरिकांना व कामगारांना वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध होतील. त्यामुळे आयुक्तांनी तातडीने शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, यासाठी आम्ही पाठपुरावा करीत असल्याचेही मोहिते यांनी सांगितले.