साखळी तोडण्यासाठी फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण करण्याची मागणी होत आहे.
फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या नागरिकांना प्रथम कोरोना लसीकरण करून कोरोनाचा संसर्ग टाळता
येणे शक्य आहे. मात्र आरोग्य यंत्रणेकडून
तसा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. फ्रंटलाईन वर्कर्समध्ये ग्रामपंचायत सदस्य, कोरोना दक्षता समिती, लोकप्रतिनिधी, पत्रकार, विविध आस्थापनातील कर्मचारी, दुकानदार, भाजीपाला विक्रेते आदींचा समावेश होतो. समाजातील या जबाबदार घटकांना बाजूला ठेवून कोरोना लसीकरण सुरू आहे. ज्यांचा प्रत्यक्ष लोकांशी संपर्क येतो, अशा व्यक्तींना अग्रक्रमाने कोरोनाची लस देणे आवश्यक आहे.
या वर्गाचे लसीकरण झाले नाही, तर कोरोनाचा फैलाव रोखणे शक्य नाही, अशीही नागरिकांमधून चर्चा आहे.