सांगली : भाजपा युवा मोर्चाच्या पश्चिम बंगाल येथील रॅलीवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ सांगलीत गुरुवारी निदर्शने करण्यात आली. युवा मोर्चाचे शहरजिल्हाध्यक्ष धीरज सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तृणमुल काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.पश्चिम बंगाल येथे युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांच्या नेतृत्वाखालील पदयात्रेवर हल्ला करण्यात आला होता. त्याच्या निषेधार्थ शहरातील स्टेशन चौक येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व तृणमूल काँग्रेसविरोधात घोषणा करून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यावर हल्ले केल्यास त्याला जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही सुर्यवंशी यांनी दिला.यावेळी उपाध्यक्ष निरंजन आवटी, सरचिटणीस अजिंक्य पाटील, दिगंबर जाधव, प्रथमेश वैद्य, नगरसेवक संजय यमगर, उर्मिला बेलवलकर, सुजित राऊत, रघुनाथ सरगर, इम्रान शेख, उमेश हार्गे, सागर व्हनखंडे, सलीम पन्हाळकर, अजिंक्य हंबर, चेतन माडगुळकर, स्वप्नील मगदूम, अमित देसाई, संग्राम शिंदे, मकरंद म्हामुलकर, अक्षय पाटील, पृथ्वीराज पाटील, अमित गडदे उपस्थित होते.