मिरज : मिरजेत कोकणे गल्ली येथील श्रावणी विकास माळी (वय १७) ही युवती व अस्वले कॉलनीतील सोनाबाई पांडुरंग अस्वले (५५) या महिलेचा डेंग्यूसदृश तापामुळे मृत्यू झाला. अस्वले कॉलनीत व परिसरात अस्वच्छतेमुळे डेंग्यूसदृश आजारांची अनेकांना लागण झाली असून डेंग्यूसदृश तापामुळे दोघींच्या झालेल्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.महापुराच्या आपत्तीनंतर साथींच्या आजारांमुळे नागरिक हैराण आहेत. कोकणे गल्लीतील बारावीत शिकणारी श्रावणी माळी हिला वारंवार ताप येत असल्याने तिला कोल्हापुरात खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेहोते. उपचार सुरू असताना मंगळवारी श्रावणीचा मृत्यू झाला तसेचअस्वले कॉलनीत सोनाबाई अस्वले यांना दोन दिवस ताप येत असल्याने त्यांना उपचारासाठी मिरजेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; पण उपचारसुरू असताना त्यांचाही बुधवारी मृत्यूझाला.अस्वले कॉलनीत आणखी काहीजणांना डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याने त्यांच्यावर शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती मिळाली. डेंग्यूसदृश तापाने दोघींच्या झालेल्या मृत्यूमुळे शहरातील अस्वच्छता व महापालिका आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. डासांच्या प्रतिबंधासाठी स्वच्छता व धूरफवारणीसह आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी आहे. सोनाबाईअस्वले यांच्या मृत्यूमुळे अस्वलेकॉलनी परिसरात महापालिका आरोग्य विभागाकडून स्वच्छता व रुग्णांचे सर्वेक्षण करून संशयित रुग्णांवर उपचार करण्यात आले.
मिरजेत डेंग्यूसदृश तापामुळे महिलेसह युवतीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:11 AM