शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

पहाटे दाट धुके, दुपारी कडक ऊन!

By admin | Published: April 13, 2017 1:08 PM

धुक्याच्या दाट दुलईचा आल्हाददायक आनंद अनुभवला

आॅनलाईन लोकमतसांगली, दि. १३ : गेल्या काही दिवसांपासून ४० अंशापेक्षा जादा तापमानाचा सामना करणाऱ्या सांगलीकरांना बुधवारी पहाटेच्या सुमारास धुक्याच्या दाट दुलईचा आल्हाददायक आनंद मिळाला. पहाटे पाचपासून सकाळी सातपर्यंत शहर अक्षरश: धुक्यात गायब झाले होते. पहाटे जॉगिंग, वॉकिंगला बाहेर पडणाऱ्यांनी धुक्याचा हा सुखद धक्का अनुभवला. दुपारनंतर मात्र पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवला. दुपारी सांगलीचा पारा ४२ अंशापर्यंत गेला होता.गेल्या आठवड्याभरापासून सांगलीकर उन्हाच्या तडाख्याने होरपळून निघत आहेत. उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाहीलाही होत असताना बुधवारी पहाटेच्या सुमारास नागरिकांना गारव्याचा अनुभव आला. पहाटेच्या सुमारास शहरावर धुक्याची चादर पसरली होती. सकाळी आठपर्यंत हे धुके शहरावर कायम होते. या धुक्याच्या गारव्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना हिवाळ्यातील वातावरण अनुभवण्यास मिळाले. तसेच निसगार्चा हा चमत्कारही अनुभवता आला. पसरलेले धुके आणि थंडीमुळे शहरवासीयांना उकड्यातून काहीसा थंडावा मिळाला. पण वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे आरोग्यामध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे.पहाटे लवकर सुरू होणाऱ्या चहा-नाष्ट्याच्या गाड्यांवर कामावर जाणाऱ्यांची, तसेच फिरायला जाणाऱ्यांची गर्दी झाली. हिमवर्षाव झाल्यानंतर किंवा तीव्र थंडीची लाट आल्यानंतर जशा तोंडातून गरम वाफा बाहेर पडतात, तसाच अनुभव बुधवारी सकाळी नागरिकांना आला. गावभाग, कृष्णा नदीकाठ परिसर, आमराई, वखारभाग, खणभाग, विश्रामबाग, कोल्हापूर रस्ता आदी भागातून आठ-साडेआठनंतरच नागरिकांची नित्यकामाची लगबग जाणवू लागली. धुक्याचे हे वातावरण टिपण्यासाठी अनेकांनी सेल्फी काढून घेतली. अनेकांनी सोशल मीडियावरून मित्रमंडळी, नातेवाईकांशी, हा धुक्याचा आनंद लुटण्यासाठी संपर्क साधला होता. सकाळच्या हुडहुडी भरविणाऱ्या या गारव्याचा आनंद काही तासच टिकला. दुपारनंतर पुन्हा उन्हाचा तडाखा वाढला. दुपारच्या सुमारास तब्बल ४२ अंशावर पारा गेला होता.शिराळा पश्चिम भाग गारठलाशिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात पहाटेपासून सकाळी नऊपर्यंत दाट धुके पसरले होते. वाहनधारकांना वाहनांचे दिवे लावूनच वाहन चालवावे लागत होते. शिराळा तालुक्याचे पश्चिम भागातील कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या पावलेवाडी खिंडीपासून चांदोलीपर्यंत मंगळवारी मध्यरात्रीपासून सकाळी नऊपर्यंत दाट धुके होते. हवेत थंडी होती, गारठा जाणवत होता. त्यामुळे शेतीची कामे करण्यात अडथळे निर्माण झाले होते. शाळकरी मुलांना परीक्षेसाठी धुक्यातून वाट काढतच जावे लागले.