शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

Lok Sabha Election 2019 निवडणूक मैदानात ४९ टक्के उमेदवारांचे होते डिपॉझिट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:24 PM

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगलीच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात आजवर डिपॉझिट जप्त होणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण हे ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सांगलीच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात आजवर डिपॉझिट जप्त होणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण हे सरासरी ४९ टक्के इतके राहिले आहे. एकूण १६ निवडणुकांमध्ये चार निवडणुकांत केवळ दोनच उमेदवार रिंगणात राहिल्याने कोणाचेही डिपॉझिट जप्त झाले नव्हते. उर्वरित १२ निवडणुकांमध्ये अनेक उमेदवारांना अनामत वाचविता आली नाही.लोकसभेच्या इतिहासात १९५७, १९७७, १९८0, १९८४ याच चार निवडणुकांत दोनच उमेदवार रिंगणात होते. अशावेळी कोणाचीही अनामत जप्त झाली नाही. मात्र १९७१ मध्ये झालेल्या निवडणुकीत ६ उमेदवार रिंगणात असताना, विजेता वगळता अन्य पाचही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. काँग्रेसचे गणपती तुकाराम गोटखिंडे यांनी एकूण मतांच्या ७८.११ टक्के मते मिळवित एकतर्फी विजय मिळविला होता. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार भगवानराव सूर्यवंशी यांना १0.७७ टक्के मते मिळाली होती. उर्वरित पंधरा निवडणुकांमध्ये कधीही असे चित्र दिसले नाही. विजयी व त्याच्या प्रतिस्पर्धी उमेदवारालाच अनामत वाचविता आली. २0१४, २00९ आणि १९९१ मध्ये ८५ टक्क्यांहून अधिक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. यंदाच्या निवडणुकीतही डझनभर उमेदवार रिंगणात आहेत. अशावेळी कितीजणांचे डिपॉझिट जप्त होणार, हा चर्चेचा विषय आहे. सध्या २५ हजार रुपये डिपॉझिट ठेवण्यात आले आहे. टप्प्या-टप्प्याने अनामत रकमांमध्ये वाढ होत आहे.वर्ष एकूण डिपॉझिट टक्केउमेदवार जप्त झालेले४१९५२ : ४ २ ५0४१९५७ : २ 0 0४१९६२ : ४ २ ५0४१९६७ : ४ २ ५0४१९७१ : ६ ५ ७१४१९७७ : २ 0 0४१९८० : २ 0 0४१९८४ : २ 0 0४१९८९ : ५ ३ ६0४१९९१ : ८ ६ ७५४१९९६ : १८ १५ ८८४१९९८ : ४ २ ५0४१९९९ : ४ २ ५0४२००४ : ८ ५ ७१४२००९ : १४ १२ ८६४२०१४ : १७ १५ ८८डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून आवश्यक मतेआजही अनेकांना नेमके डिपॉझिट वाचविण्यासाठी किती मते लागतात, हे माहीत नाही. एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही, हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मते मिळाली नाहीत, तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होत असते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक