शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

शिराळा बाजार समितीमध्ये देशमुख-नाईकांची युती निश्चित

By admin | Published: June 26, 2015 11:03 PM

लवकरच घोषणा : दोन भाऊंच्यामध्ये प्राथमिक चर्चा पूर्ण

सागाव : शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी कॉँग्रेसचे आ. शिवाजीराव देशमुख व राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक गटाची युती निश्चित असल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या आ. शिवाजीराव नाईक गटानेदेखील या निवडणुकीत अर्ज दाखल केले आहेत. यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गत पंचवार्षिक निवडणुकीत आ. देशमुख व माजी आमदार नाईक गट एकत्रित आले होते. त्यावेळी शिवाजीराव नाईक गट एकाकी पडल्याने माघार घेतली होती. यावेळी माजी आमदार नाईक गटाला ११ जागा व उपसभापतीपद, तर देशमुख गटाला ८ जागा व सभापतीपद असा फॉर्म्युला होता. त्यानुसार त्यांनी बाजार समितीत काम केले. यावर्षीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून यावेळी तिन्ही गटाकडून अर्ज दाखल केले आहेत. जरी देशमुख व माजी आमदार नाईक गटांनी आपले अर्ज भरले असले तरी, या निवडणुकीत दोन्ही गटांची युती निश्चित आहे. याबाबत सत्यजित देशमुख व मानसिंगराव नाईक यांच्यात प्राथमिक चर्चा झाली आहे. अर्ज मागे घेण्याच्या अगोदर या युतीची अधिकृत घोषणा होणार आहे. यावर्षीही गत निवडणुकीप्रमाणेच जागांचा फॉर्म्युला होणार, हे निश्चित आहे. या दोन्ही गटांची युती निश्चित धरूनच आ. नाईक गटाने अर्ज दाखल केले आहेत. जागा वाटपात काही तरी पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आ. नाईक गट असणार आहे. तसेच गतवेळेप्रमाणे याहीवेळी शिवाजीराव नाईक गटाला बाजार समितीतून बाहेर ठेवायचे, असा दोन्ही नेत्यांचा प्रयत्न असणार आहे. नेमके काय होणार, हे १४ रोजी अर्ज माघारीच्या वेळीच स्पष्ट होईल. (वार्ताहर)शिवाजीराव नाईक गटाला दूर ठेवण्याचा प्रयत्नगत निवडणुकीप्रमाणेच जागांचा फॉर्म्युला होणार, हे निश्चित आहे. या दोन्ही गटांची युती निश्चित धरूनच आ. नाईक गटाने अर्ज दाखल केले आहेत. जागा वाटपात काही तरी पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आ. नाईक गट असणार आहे. तसेच गतवेळेप्रमाणे याहीवेळी शिवाजीराव नाईक गटाला बाजार समितीतून बाहेर ठेवायचे, असा दोन्ही नेत्यांचा प्रयत्न असणार आहे.