शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

देशमुखांचा ‘वालचंद’शी संबंधच काय? : दीपक शिंदे

By admin | Published: June 26, 2016 1:01 AM

सारेच कायदेशीर होते तर दडपशाही कशाला?

सांगली : साऱ्याच गोष्टी श्रीराम कानिटकरांनी कायदेशीरपणे केल्या असत्या, तर त्यांना दडपशाहीचा वापर करावा लागला नसता. पाच वर्षांत घाईगडबडीने त्यांनी पृथ्वीराज देशमुख यांना जवळ केले. वास्तविक देशमुख यांचा महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन (एमटीई) सोसायटीशी काहीही संबंध नाही, असे मत भाजपचे नेते दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, आम्ही या संस्थेत शिकलो. या संस्थेबद्दल आम्हाला आस्था आहे. त्यामुळेच ज्या बेकायदेशीर गोष्टी सुरू आहेत, त्यांना आम्ही उघडपणे विरोध करीत आहोत. अजित गुलाबचंद यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही. ते मला ओळखतही नाहीत. त्यामुळे कोणाच्या सल्ल्याने मी संघर्ष करीत नाही. एमटीईचे सचिव श्रीराम कानिटकरांनी बेकायदेशीररीत्या विशेष सभा बोलावून अध्यक्ष निवडीसह नियामक मंडळच बरखास्त करण्याचा ठराव केला होता. त्यापूर्वीच आम्ही यासंदर्भातील तक्रार धर्मादाय आयुक्तांकडे केली होती. आमचे नियामक मंडळ कायदेशीर असल्यामुळे शासन अनुदान रीतसर मिळत होते. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत होते. बेकायदेशीर गोष्टी असत्या, तर शासनाने कधीच कारवाई केली असती. एमटीई सोसायटीने तयार केलेली घटना दुरुस्ती शासनाने मान्य केली आहे. त्यानंतर स्वायत्तता मिळाल्यानंतर शासनाने कंट्रोल बोर्डाच्या स्थापनेचे परिपत्रक काढले होते. मात्र, संस्थेच्या नियामक मंडळाचे स्वरूप परिपत्रकाप्रमाणेच होते. केवळ नावाचा बदल होता. तरीही शासनाने नावाबाबत कोणताही आग्रह धरलेला नव्हता. त्यामुळे आमचे नियामक मंडळच कायम राहिले. त्यानंतरही शासनाने अनुदान व अन्य गोष्टी महाविद्यालयाला दिल्या. एमटीईच्या दुसऱ्या गटाचे अध्यक्ष विजय पुसाळकर म्हणाले की, या सोसायटीचा मीच अधिकृत अध्यक्ष आहे. कानिटकरांनी बेकायदेशीररीत्या सभा घेऊन नवे मंडळ स्थापन्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ५ आॅगस्ट २0११ रोजी चार ते पाच मोठ्या वाहनांमधून देशमुख यांचे लोक पुण्यात आले आणि त्यांनी जबरदस्तीने कार्यालयाचा ताबा घेतला. तेथील सर्व कागदपत्रे त्यांनी सांगलीला स्थलांतरित केली. संस्थेच्या खात्यावर जमा असलेल्या साडेसात कोटी रुपयांपैकी सहा कोटी रुपये त्यांनी बँकेत खोटी कागदपत्रे दाखवून अन्यत्र वर्ग केले. संचालक डॉ. जी. व्ही. परीशवाड यांनाही हाकलून बाहेर काढले. याबद्दल आम्ही त्या-त्यावेळी पोलिसांत तक्रारी केल्या आहेत. (प्रतिनिधी) उगार शुगर्सचा प्रतिनिधी उगार शुगर्सचा प्रतिनिधी म्हणून एमटीई सोसायटीवर माझी नियुक्ती झाली. त्यानंतर उगार शुगर्सने मला नियुक्तीपत्र दिले आहे. तसेच आजअखेर मी सोसायटीचा सभासदही आहे, असे स्पष्टीकरण विजय पुसाळकर यांनी यावेळी दिले. दादागिरी त्यांच्याकडूनच... पुणे तसेच सांगलीतील कार्यालयात पृथ्वीराज देशमुख यांच्या गटाकडून जो प्रकार झाला, तो दडपशाहीचाच प्रकार होता. आम्ही कधीच अशा गोष्टी केलेल्या नाहीत. दादागिरी त्यांच्याकडूनच झाली आहे, असे मत दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी व्यक्त केले.