शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पलूस एमआयडीसीचा विकास खुंटला

By admin | Published: January 15, 2015 10:54 PM

राजकर्त्यांसह प्रशासनाचेही दुर्लक्ष : उद्योग वाढविण्यासाठी जागाच नसल्याचा परिणाम

किरण सावंत - किर्लोस्करवाडी -पलूस औद्योगिक वसाहतीमध्ये (एमआयडीसी) जागेची पुरेशी उपलब्धता नसल्यामुळे उद्योजकांना उद्योग वाढविण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. यातूनच विकास खुंटला आहे. या प्रश्नांवर शासनाकडे तक्रारी दाखल करूनही दखल घेतली जात नाही. उद्योगमंत्री प्रकाश मेहता यांनी लक्ष घालून जागेची उपलब्धता करुन देण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे.पलूस औद्योगिक वसाहत सांगली जिल्ह्यातीलच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रातील नावाजलेली औद्योगिक वसाहत आहे. किर्लोस्कर कारखान्यामुळे पलूसची एमआयडीसी देशपातळीवर लौकिकप्राप्त ठरलेली आहे. पलूसच्या या औद्योगिक वसाहतीची स्थापना १९७५ मध्ये झाली. ३५ एकर क्षेत्रावर ही औद्योगिक वसाहत भरभराटीस आली आहे. अनेक संकटांवर मात करीत प्रगती केली आहे. किर्लोस्कर उद्योग समूहाने त्यांना केवळ मार्गदर्शनच नव्हे, तर त्यांच्या उद्योगाला कामसुध्दा दिले. उद्योजकतेची गुणवत्ता असणाऱ्या या सेवानिवृत्त तरुण होतकरुंना काम मिळाल्याने त्यांनी संधीचे सोने केले. परंतु उद्योगास चालना मिळाल्याने किर्लोस्करांकडून मिळणाऱ्या कामावर अवलंबून न राहता, येथील अनेक उद्योजकांनी अन्य राज्यांतून काम उपलब्ध करण्यात यश मिळविले. या प्रगतशील एमआयडीसीला पुरेशा दाबाने अखंड वीजपुरवठा करुन सहकार्य केले. भारनियमन नसल्याने येथील उद्योजक पूर्ण क्षमतेने उत्पादन घेताना दिसतात. त्यापैकी १६७ उद्योग पूर्ण क्षमतेने चालू आहेत. आज सर्व उद्योगात मिळून ४ हजार २00 कामगार उदरनिर्वाह करीत आहेत. प्रगत आणि आधुनिकतेवर आधारलेली एमआयडीसी म्हणून दबदबा असला तरी, येथील असंख्य तरुण उद्योजक जागेअभावी आपला उद्योग सुरु करत करू शकत नाहीत. शिवाय, सध्याचा उद्योग वाढवण्यातही उद्योजकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. पलूसच्या जवळच गे्रप वाईनसाठी आरक्षित जागा असून, तेथील प्लॉट देण्याची उद्योजकांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. परंतु, याकडे शासन आणि राजकर्ते गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे उद्योजकांतून नाराजी व्यक्त होत आहे.सांडगेवाडीची जागा देण्याची मागणीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार संजय पाटील यांनी प्रयत्न करून सांडगेवाडी येथील कृष्णा वाईन पार्कमधील प्लॉट पलूसमधील तरुण उद्योजकांना उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी येथील सर्व उद्योजक नवीन सरकारकडे करीत आहेत.जुन्या सरकारने लक्ष दिले नाही, आता नवीन सरकारमधील उद्योगमंत्री तरी लक्ष देतील का? असा प्रश्न उद्योजकांतून उपस्थित होत आहे.