विटा : कोरोनाकाळात थांबलेली विकासकामे आणि शासकीय निधी आ. अनिल बाबर यांच्या प्रयत्नातून खानापूर मतदारसंघाला मिळू लागला आहे. त्यामुळे गावपातळीवर सर्व लोकांनी राजकारण, गट-तट बाजूला ठेऊन विकासकामांसाठी एकत्रित यावे, असे आवाहन सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले.
खानापूर तालुक्यातील चिंचणी (मं.) येथे अंतर्गत रस्त्याच्या कामाचा प्रारंभ बाबर यांच्याहस्ते करण्यात आला. सभापती महावीर शिंदे, शशिकांत आदाटे, शहाजीराव निकम, अशोक निकम. विलास निकम, आनंदराव निकम, राजेंद्र पाटील उपस्थित होते.
सुहास बाबर म्हणाले, विविध गावांना जोडणारे रस्ते चांगल्या दर्जाचे झाले आहेत. आता अंतर्गत रस्ते व वाड्या-वस्तीवरील रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. लोकांना दळणवळणाच्या सुविधा उत्तम प्रकारच्या होण्यासाठी रस्ते चांगले असणे गरजेचे आहे. ज्या-ज्या गावातील मागणी असेल त्यास प्राधान्यक्रमाने विकासकामे देण्यात येतील.
यावेळी उपसरपंच अनिल निकम, धनाजी सुर्वे, लक्ष्मण निकम, विनोद निकम, वसंत निकम, आनंदराव निकम, शंकर निकम, संजय निकम, सचिन पाटील, प्रशांत धनवडे, पंढरीनाथ शिंदे, दिनकर निकम, सर्वजीत पवार, सचिन निकम, भगवान पवार, तानाजी निकम, राजेंद्र रणपिसे, विठ्ठल पवार, शशिकांत माने, निवास किर्दत, तुकाराम निकम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.