वाळवा : ग्रामपंचायत व जिल्हा परिषद माध्यमातून एका वर्षात एक कोटी ५५ लाख ७० हजार रुपये खर्च करून विविध विकासकामे पूर्ण केली आहेत, अशी माहिती सरपंच डॉ. शुभांगी माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्या म्हणाल्या, जिल्हा वार्षिक नियोजन योजनेतून वाळवा-तुजारपूर रस्त्याचे ११.५० लाख रुपये खर्चून डांबरीकरण केले. तसेच १७ लाख रुपये खर्च करून थोरात निवास ते तगारे वस्ती जाणारा रस्ता डांबरीकरण केला. १४व्या वित्त आयोग योजनेतून जिल्हा परिषद शाळा नंबर-२ फरशी बदलणे, दुरुस्ती, शैक्षणिक साहित्य, ६.५० लाख रुपये खर्च केले. जिल्हा परिषद शाळा नंबर-४साठी १३ लाख खर्च करून रंगकाम, फरशी बदलणे, गिलावा, वाॅल कम्पाउंड, दुरुस्ती कामे केली. १३.५० लाख रुपये खर्च करून ३१ अंगणवाड्यांना बेंच पुरविले. यासह इतर विकासकामे मार्गी लावली आहेत.
यावेळी उपसरपंच पोपट अहिर, नाजी सापकर, इसाक वलांडकर, उमेश कानडे, संदेश कांबळे, आशा कदम, सुजाता पवार, मनीषा माळी, डॉ. अशोक माळी, प्रमोद यादव, प्रकाश गुईंगडे, उदय सावंत, विजय हिरवे, पांडुरंग सूर्यवंशी, रमेश जाधव, नागू यमगर उपस्थित होते.