शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांनी दरडग्रस्तांसोबत केलं जेवण, वाढीव मदतीची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 17:39 IST

Ambeghar landslide Visit:साताऱ्यातील आंबेघरमध्ये दरड कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देदरड दुर्घटनेनंतर तिथल्या लोकांची गावातील शाळेत सोय करण्यात आली आहे.

सातारा: भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. आज त्यांनी पाटण तालुक्यात आंबेघर आणि मोरगिरीमधील गावऱ्यांची भेट घेतली. 23 जुलै रोजी आंबेघरमध्ये दरड कोसळून 15 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गावातील नागरिकांची शाळेत निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यावेळी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी गावकऱ्यांची फक्त भेटच घेतली नाही, तर त्यांच्यासोबत जेवणही केलं.

मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय. चिपळूणसारख्या ठिकाणी आलेल्या पुरामुळे नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झाल, तर अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, साताऱ्यातील आंबेघरमध्येही दरड कोसळून 15 जणांचा मृत्यू झालाय. 

आज या परिसराच्या पाहणीसाठी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर आले होते. यावेळी त्यांनी मोरगिरी गावातील शाळेत असणाऱ्या दरडग्रस्त लोकांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आंबेघरमध्ये झालेल्या दरड दुर्घटनेनंतर तिथल्या लोकांची या शाळेत सोय करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपच्या या दोन्ही नेत्यांनी यावेळी या दरडग्रस्तांसोबत शाळेतच जेवणदेखील केलं. 

वाढीव मदत मिळणं गरजेचंदरडग्रस्तांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'नुकसान खूप मोठं आहे. या सर्व दरडग्रस्तांच पुनर्वसन होणं गरजेचं आहे. शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालंय. अशा घटनांच्या वेळी मिळणारी मदत तोकडीच असते. पण त्यांना वाढीव मदत मिळणं अपेक्षित आहे. तात्पुरती नाही तर शक्य ती मदत परमनंट करावी लागेल',असे मत त्यांनी यावेळी व्यक्तं केलं. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSatara Floodसातारा पूरPraveen Darekarप्रवीण दरेकरfloodपूरRainपाऊस