शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

Sangli News: पाणी चोरी प्रकरणामुळे ढालगाव ग्रामपंचायतीचे नुकसान; २५ लाख दंड वसूल करा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 5:06 PM

ग्रामपंचायतीने कायदेशीर मार्गाने कठोर कारवाई करावी, असा एकमुखी ठराव ग्रामसभेत मंजूर

ढालगाव : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील जलस्वराज्य योजनेचे पाणी चोरी प्रकरणामुळे ग्रामपंचायतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पाणी चोरांकडून २५ लाख रुपये दंड व व्याजाची रक्कम वसूल करा. या वसुलीसाठी ग्रामपंचायतीने कायदेशीर मार्गाने कठोर कारवाई करावी, असा एकमुखी ठराव ग्रामसभेत मंजूर केला.ढालगाव येथे २०१७ पासून ही पाणीचोरी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामसभा बोलावली होती. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले.ढालगावसाठी जीवनदायी असणाऱ्या जलस्वराज्य योजनेच्या मुख्य पाइपलाइनमधून पाणी चोरी प्रकरण उजेडात आले आहे. याबाबत ढालगाव ग्रामपंचायतीने कवठेमहांकाळ पोलिसांत फिर्याद दिली होती. ग्रामस्थांनी दोषींवर कठोर कारवाई करावी आणि दंडाची वसुली करावी, यासाठी तातडीची ग्रामसभा बोलावली होती.

यात आरोपीला दंडाची वसुली नोटीस पाठवावी व हा दंड वसूल करण्यासाठी कठोर कारवाई करावी, असा ठराव एकमताने मंजूर झाला. हा ठराव सागर झुरे यांनी मांडला तर अनुमोदन युवराज घागरे यांनी दिले. तसेच या पाणीचोरीला पाठीशी घालणाऱ्यांची चौकशी व्हावी, असाही ठराव माणिक देसाई यांनी मांडला. त्याला अनुमोदन सुरेश घागरे यांनी दिले. हे दोनच ठराव या ग्रामसभेत मंजूर केले.सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे, मनोज पाटील यांच्यासह पोलिस बंदोबस्त होता. यावेळी भगवान वाघमारे, सरपंच मनीषा देसाई, उपसरपंच भीमराव घागरे, तम्माण्णा घागरे, जनार्दन देसाई, दिलावर मणेर, संजय घागरे, माधवराव देसाई, दिलीप झुरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायत