विशाल देसाई भारतीय सैन्यदलात होते. सुट्टी संपल्यानंतर ते परत कामावर निघाले होते. पुणे येथील विमानतळावर त्यांची प्रकृती खालावली. तेथून परत गावी आल्यावर मिरजेच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी सायंकाळी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच ढालगाव गावावर शोककळा पसरली.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह ढालगावला आणण्यात आला. ग्रामपंचायतीजवळ त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अंत्ययात्रेनंतर देसाई मळ्यात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिवसेना तालुका उपप्रमुख धनंजय देसाई, महाकाली साखर कारखान्याचे संचालक संजय पाटील, माणिक देसाई, जनार्धन देसाई, अजित खराडे यांनी श्रद्धांजली वाहून पुष्पचक्र वाहिले. उपसरपंच माधवराव देसाई, विजय घागरे, विशाल खोळपे, अरुण देसाई उपस्थित होते.
चौकट
ढालगाव येथील मुख्य चौकात ‘जवान विशाल देसाई अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. विशाल यांचे वडील गोरख आण्णा देसाई यांचे दोन वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. विशाल यांंचे सहा वर्षांपूर्वी ढालेवाडी येथील गोपीनाथ चव्हाण यांच्या मुलीशी लग्न झाले होते. त्यांना दोन वर्षांचा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी आहे.