विकास शहाशिराळा :दुध दरवाढीच्या आंदोलनामध्ये रस्त्यावर दूध ओतून नुकसान च आहे मग आपल्या जनावरांना व आपल्यासारख्या शेतकऱ्यांना कोण अभिषेक घालणार हा विचार करून पाडळी( ता.शिराळा) दोन युवक शेतकरी बंधूनी अपल्याच गाईंना तसेच स्वतःचा स्वतःलाच दुधाचा अभिषेक केला. अभिषेक करून एक वेगळे आंदोलन केले.
महादेव पाटील व शरद पाटील हे दोघे भाऊ शेती करतात याचबरोबर त्यांचे कडे १२-१३ गाई आहेत.दररोज १६० ते १७० लिटर दुध मिळते ते गावातील दूध संकलन केंद्रात दूध पाठवतात. शरद हे मुंबई मध्ये भाजीपाला विक्री व्यवसाय करतात सध्या कोरोना मुळे लॉक डाऊन झाल्यावर ते आपल्या गावी आले आहेत तर त्यांचा लहान भाऊ महादेव हा शेती बरोबरच आधुनिक पद्धतीने गोटा करून १२-१३ गाई पळत आहेत
आज दूध आंदोलनामुळे दूध संकलन बंद आहे तसेच आंदोलनकर्ते दूध ओतून देत आहेत. हे दूध ओतून देण्यापेक्षा आपल्याला आयुष्य भर दूध देऊन आपला संसार सुखाचा करत आहेत त्यांना आपण अभिषेक केला तर उत्तम हा विचार या बंधूंना आला.आणि त्यांनी आपल्या सर्व गाईंना अभिषेक घातला.
एवढेच न करता आपल्या सारख्या सामान्य शेतकरी माणसांना कोण अभिषेक घालणार म्हणून त्यांनी स्वतःचा स्वतः अभिषेक घालून घेतला.या आगळ्या वेगळ्या दूध आंदोलनामुळे चर्चेचा विषय बनला आहे.
दूध रस्त्यावर अथवा गटारीमध्ये ओतण्या पेक्षा जी जनावरे आपणास आयुष्यभर साथ देतात , ज्यांचे मुळे आपले जीवनमान उंचावते या जनावरांना अभिषेक घातला तर त्यांनाही आनंद मिळेल. आपल्या सारख्या सामान्य शेतकऱ्यांना पण कोण अभिषेक घालणार याच विचाराने आपण जनावरांना व स्वतःला अभिषेक घातला- शरदपाटीलशेतकरी , पाडळी