सांगली : कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सांगली जिल्ह्यातील बाधीत रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे.
यामध्ये मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज, जत तालुक्यातील निगडी खुर्द , तासगाव तालुक्यातील मौजे शिरगाव परिसराचा समावेश आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
मौजे डिग्रज परिसर कंटेनमेंट झोन
मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज हद्दीत कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथील 1) पूर्व - कवट वाट अजित पाटील यांची मिळकत नं. 731 2) पश्चिम - कृष्णा नदी 3) दक्षिण - जगु शिवा काटे मिळकत नं. 171 4) उत्तर - सुनिल यशवंत कोळी प्लॉट मिळकत नं. 967/1, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) पूर्व - विकास लक्ष्मण पाटील वगैरे यांचा गट नं. 501 2) पश्चिम - कृष्णा नदी 3) दक्षिण - सचिन बाबासाहेब बिरनाळे यांचा गट नं. 690 4) उत्तर - रावसाहेब शिवगोंडा पाटील यांचा गट नं. 166.जत तालुक्यातील निगडी खुर्द जत तालुक्यातील मौजे निगडी खुर्द येथील टेकडेवस्ती येथील हद्दीत कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे.कंटेनमेंट झोन - मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथील टेकडेवस्ती येथील 1) निगडी खुर्द येथील टेकडेवस्ती परिसराच्या उत्तरेकडे यशवंत आप्पा सावंत यांच्या जमीनीपर्यंत 2) निगडी खुर्द येथील टेकडीवस्ती परिसराच्या पूर्वेकडे पवनचक्की रोडलगत पांडुरंग रामदास जाधव यांच्या जमीनीपर्यंत 3) निगडी खुर्द येथील टेकडीवस्ती परिसराच्या दक्षिणेकडे अशोक शवसंत साळे यांच्या जमीनीपर्यंत 4) निगडी खुर्द येथील टेकडीवस्ती परिसराच्या पश्चिमेकडे दामोदर लक्ष्मण साळे यांच्या जमीनीपर्यंत, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.बफर झोन 1) निगडी खुर्द येथील टेकडीवस्ती परिसराच्या उत्तरेकडे निगडी खु. ते वायफळ रस्त्यालगत समाधान महादेव सावंत यांच्या जमीनीपर्यंत 2) निगडी खुर्द येथील टेकडीवस्ती परिसराच्या पूर्वेकडे बबन भाऊसाहेब शिंदे यांच्या जमीनीपर्यंत 3) निगडी खुर्द येथील टेकडीवस्ती परिसराच्या दक्षिणेकडे शिंदेवस्ती एक नंबर रस्त्यालगत पांडुरंग विठ्ठल शिंदे यांच्या जमीनीपर्यंत 4) निगडी खुर्द येथील टेकडीवस्ती परिसराच्या पश्चिमेकडे मोरे वस्ती व जाधव वस्ती रस्त्यालगत कुंडलिक लक्ष्मण मोरे यांच्या जमीनीपर्यंत.तासगाव तालुक्यातील शिरगाव तासगाव तालुक्यातील मौजे शिरगाव वि. गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. कंटेनमेंट झोन - तासगाव तालुक्यातील मौजे शिरगाव वि. येथील 1) पूर्व - ओघळ व गट नं. 386, 387, 388 2) पश्चिम - बनाबाई शिवाजी जाधव यांचे घर गट नं 402 3) उत्तर - विलास नारायण पाटील यांचे घर गट नं 382 4) दक्षिण - आनंदराव सदाशिव चव्हाण यांचे घर गट 391,392.बफर झोन - 1) पूर्व - बलवडी कालवा व गट नं. 279, 2) पश्चिम - येरळा नदी पात्र व गट नं. 402 3) उत्तर - मोरे वस्ती रस्ता 4) दक्षिण - गावाचा ओढा.या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.