सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये महापौरपदावरून मोठी चुरस होती. निवडीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली तरी उमेदवार निश्चित होत नव्हता. अखेर अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली आणि जयंत पाटील यांचा निरोप आला. शेवटच्याक्षणी दिग्विजय सूर्यवंशी यांचे नाव निश्चित करण्यात आले.
दोन्ही काँग्रेसचे नगरसेवक कोल्हापुरातील हाॅटेलवर होते. तिथे सकाळी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील दाखल झाले. संजय बजाज, सुरेश पाटील ही मंडळी रात्रीच गेली होती. सकाळीही मैनुद्दीन बागवान की दिग्विजय सूर्यवंशी हा तिढा सुटलेला नव्हता. महापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली होती. अर्ज छाननी होऊन माघारीसाठी वेळ दिला होता. याचवेळी जयंत पाटील यांनी दूरध्वनी करून मैनुद्दीन बागवान व उत्तम साखळकर यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले आणि दिग्विजय सूर्यवंशी यांना महापौरपदाची लाॅटरी लागली!