शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

दिलीपतात्यांना ‘वसंतदादा’चे ‘रेड कार्पेट’

By admin | Published: October 12, 2015 11:52 PM

गळीत प्रारंभासाठी निमंत्रण : १४ रोजी होणार कार्यक्रम; हंगामाच्या निमित्ताने गोडवा

सांगली : राजकीय पटावर नेहमी एकमेकांच्या विरोधात उभारणारे वसंतदादांचे वारसदार आणि राजारामबापूंचे कट्टर अनुयायी यांचे सूर गळीत हंगामाच्या निमित्ताने जुळले आहेत. १४ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या वसंतदादा कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभाच्या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष व जयंतरावांचे कट्टर समर्थक असलेले दिलीपतात्या पाटील यांना अध्यक्ष म्हणून निश्चित केले आहे. कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनीच त्यांच्यासाठी हे ‘रेड कार्पेट’ अंथरले आहे. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात वसंतदादा आणि राजारामबापू यांच्या संघर्षाची कहाणी वारंवार सांगितली जाते. दोन्ही नेत्यांच्या पश्चात त्यांच्या वारसदारांनीही हा संघर्ष जिवंत ठेवला आहे. विशाल पाटील, प्रतीक पाटील आणि जयंतराव यांच्यातील राजकीय शत्रुत्वाचे किस्से जिल्ह्याने अनुभवले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतही हाच संघर्ष अनुभवास आला. जिल्हा बँकेत सध्या विशाल पाटील विरोधी संचालक म्हणून काम करीत आहेत, तर जयंतरावांचे कट्टर समर्थक असलेले दिलीपतात्या पाटील या बँकेचे अध्यक्ष आहेत. संचालक मंडळाच्या बैठकीतही विशाल पाटील आणि दिलीपतात्या यांच्यात अनेकदा खडाजंगी झाली आहे. वसंतदादा साखर कारखान्यावर कारवाई करण्याच्या हालचालीही अनेकदा झाल्या. त्यामुळेही हा संघर्ष पेटणार, अशी चिन्हे दिसत होती. मात्र अचानक दोन्ही नेत्यांचे सूर गळीत हंगामाच्या निमित्ताने जुळले आहेत. सांगलीच्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गळीत प्रारंभ येत्या १४ आॅक्टोबर रोजी होणार आहे. दिलीपतात्या पाटील या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती या दोन्ही नेत्यांनीच सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. राजकीय संघर्ष चालू असला तरी, व्यक्तिगत शत्रुत्व नसल्याने हे सूर जुळल्याचे त्यांनी सांगितले.साखर हंगामाच्या निमित्ताने तयार झालेला हा दोन नेत्यांमधील गोडवा सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटावर आता नव्या चर्चेला बळ देणारा ठरू शकतो. (प्रतिनिधी)तारखाही बदलल्यादिलीपतात्या पाटील यांनाच गळीत हंगामासाठी बोलावण्याचा निर्णय विशाल पाटील यांनी घेतला होता. त्यासाठी दोनवेळा तारखाही बदलण्यात आल्याचे सांगण्यात आले. १४ आॅक्टोबर रोजी गळीत प्रारंभ करण्याचे सोमवारी निश्चित करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष शिवाजीराव गिरीधर पाटील यांना निमंत्रित करण्याचे प्रयत्न अद्याप सुरू असल्याचेही पाटील यांनी सांगितले.खिलाडू वृत्ती दाखविली पाहिजे...संचालक मंडळाच्या बैठकीत किंवा राजकीय वाटचालीत मतभेद असू शकतात. यापुढेही असे प्रसंग उद्भवले तरीही व्यक्तिगत पातळीवर हा संघर्ष येता कामा नये. खिलाडू वृतीही दाखविली पाहिजे, असे मतही दोन्ही नेत्यांनी व्यक्त केले आहे.