शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

एकीकडे आपत्ती व्यवस्थापन आराखडा, दुसरीकडे महापुराला निमंत्रण; सांगली महापालिकेचा अजब कारभार 

By अविनाश कोळी | Published: May 29, 2024 4:59 PM

प्रशासकीय स्तरावरील औपचारिकता संपणार तरी कधी?, परवानग्यांचा मलिदा कोणाला?

अविनाश कोळीसांगली : सांगली- मिरज- कुपवाड महापालिका एकीकडे आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करीत असताना दुसरीकडे नाले अन् ओतात भर टाकून काही बिल्डर, व्यावसायिकांनी आपत्ती निमंत्रणाचा कार्यक्रम जोमाने सुरू केला आहे. नाट्यपंढरी सांगलीतले हे अजब नाटक आपत्तीच्या नव्या प्रयोगाला जन्म देणारे ठरू पाहत आहे.

महापालिकेला २००५ आणि २००६ च्या महापुरानंतर नैसर्गिक नाले, ओत आणि पूरपट्टा यांचे महत्त्व कळाले. त्यावेळी सामाजिक संघटनांनीही याविषयी आवाज उठविला होता. त्यामुळेच महापालिकेच्या ८ ऑगस्ट २००६ रोजीच्या महासभेत ठराव क्रमांक ८८ द्वारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. यामध्ये नैसर्गिक नाले व त्यांच्या बफर झोनमध्ये मिळकतींचे प्रस्ताव दाखलच करून घेऊ नयेत व तसे प्रस्ताव आले, तर ते स्पष्टपणे नाकारावेत, असा निर्णय झाला होता. याबाबतच्या सूचना नगररचना, गुंठेवारी विभागाला देण्यात आल्या होत्या. तरीही गेल्या वीस वर्षांच्या काळात या क्षेत्रात हजारो बांधकामांनी महापालिकेच्या कृपेनेच बस्तान बसविले. वारंवार येणाऱ्या महापुरांनी पाणीपातळीचे नवे विक्रम नोंदविले; पण तरीही महापालिकेला अतिक्रमणांबाबत जाग आली नाही.

ठरावाचा उपयोग काय?नियम असतानाही नाले, ओत अन् पूरपट्ट्यात बांधकामे झालीच तर, ती काढून टाकावीत, असा स्पष्ट ठराव २००६ मध्ये करण्यात आला होता. तरीही आजवर एकाही बांधकामाला धक्का लागला नाही. त्यातून माफियांचा आत्मविश्वास बळावला अन् अतिक्रमणांचे रतीब याठिकाणी घालण्यास सुरुवात झाली.

परवानग्यांचा मलिदा कोणाला?दरवर्षी महापालिका केवळ आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून महापुरातील स्थलांतराचे नियोजन करून मोकळी होते. त्यानंतर वर्षभर याच क्षेत्रात परवानग्या देऊन मलिदा लाटण्याचे काम करते. हा मलिदा कोणाच्या घशात जातो, याची चौकशी आजवर एकाही आयुक्तांनी केली नाही.

आपत्ती आवडे यंत्रणांनामहापुराची तीव्रता कमी करणारे उपाय शोधण्याची तसदी प्रशासकीय स्तरावर घेतली जात नाही. उलट पूर आल्यानंतरच्या व्यवस्थापनाची तयारी केली जाते. यात दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होतात. शिवाय वाढणाऱ्या पूरपट्ट्यात परवानग्या देताना त्याचेही दरही वाढत असतात. त्यामुळे आपत्तीवर प्रेम करणाऱ्यांची संख्या महापालिकेच्या यंत्रणेत अधिक आहे.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर