शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

कोयना धरणातून सांगलीसाठी पुन्हा विसर्ग, टेंभू योजनेचे उद्यापासून आवर्तन सुरू होणार

By अशोक डोंबाळे | Published: December 26, 2023 2:57 PM

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी सांगली पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा

सांगली : कडेगाव, खानापूर, आटपाडी तालुक्यातील रबीची पीक धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली होती. त्यानुसार टेंभू योजना सुरू करण्यासाठी कोयना धरणातून मंगळवारी सकाळी ११ वाजलेपासून एक हजार ५० क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. बुधवारी सकाळी टेंभू योजनेचे विद्युत पंप सुरू करून आवर्तन सुरू करण्यात येणार आहे, असे टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी नसल्यामुळे कोयना धरणातून २२ डिसेंबरपासून विसर्ग बंद केला होता. परिणामी, टेंभू योजना सुरू करण्यात अडचणी येणार आहेत, याबद्दल ‘लोकमत’ने दि. २६ डिसेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी सांगली पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यानंतर सांगली पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोयना धरण व्यवस्थापनाकडे पाणी सोडण्याची मागणी केली.त्यानुसार कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे एक युनिट दि. २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरू केले आहे. येथून कोयना नदीपात्रामध्ये एक हजार ५० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना धरणातून पाणी सोडल्यामुळे टेंभू योजना सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीKoyana Damकोयना धरणWaterपाणी