सांगली : जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस असून २४ तासांत कोयना धरण येथे १६४, तर नवजा येथे १४५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले; तसेच कोयना धरणातही पाण्याची चांगली आवक आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून एक हजार ५० क्युसेक पाणी सोडले आहे; तसेच वारणा (चांदोली) धरण ८२.५१ टक्के भरले असून मंगळवारी दुपारपासून धरणाचे चार वक्राकार दरवाजे उचलून दोन हजार १५२ क्युसेक तर वीजनिर्मिती केंद्रातून एक हजार ६४८ कयुसेक असा एकूण तीन हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे ‘वारणा’, ‘कृष्णा’ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. सांगली आर्यविन येथे कृष्णेची पाणीपातळी २७ फुटांना स्थिर आहे.
कृष्णा नदीची आजची पाणी स्थितीपाणीपातळी फूट इंचामध्येकृष्णा पूल कराड - १४.८बहे पूल - ९ताकारी पूल - २७भिलवडी पूल - २८.४आर्यविन - २७राजापूर बंधारा - ४१.५राजाराम बंधारा - ४०.८
जिल्ह्यात १२.१ मिलिमीटर पाऊसजिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १२.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक ३१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज १२.१ (३५५), जत २ (२५७.८), खानापूर ८.९ (२८५.१), वाळवा १७.३ (५३५.७), तासगाव ८.९ (३५०.१), शिराळा ३१ (७५३.१), आटपाडी १.४ (२२९.७), कवठेमहांकाळ ४.७ (३४४.७), पलूस १३.४ (३७१.५), कडेगाव १५.५ (३६०.५).
धरणातील पाणीसाठाधरण - आज पाणीसाठा - एकूण पाणीसाठाकोयना - ६४.५५ - १०५.२५धोम - ६.६३ - १३.५०कन्हेर - ६.११ - १०.१०वारणा - २८.१५ - ३४.४०दूधगंगा - १६.७२ - २५.४०राधानगरी - ७.३६ - ८.३६तुळशी - २.६२ - ३.४७कासारी - २.०४ - २.७७पाटगाव - ३.२६ - ३.७२धोम-बलकवडी - २.०३ - ४.०८उरमोडी - ४.१० - ९.९७तारळी - ३.४२ - ५.८५अलमट्टी - ९१.८३ - १२३.०८