शहरं
Join us  
Trending Stories
1
Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?
2
देवदर्शनाचा मोफत प्रवास नडला २१ जण जखमी; खेड तालुक्यातील एका भावी आमदाराची राजकीय वारी
3
'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?
4
VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!
5
UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...
6
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी
8
मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
9
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....
10
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 
11
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
12
'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
13
राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू
14
“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
15
“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 
16
"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल
17
"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  
18
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
19
“खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजपा करते”; अमित गोरखेंची प्रतिक्रिया
20
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी

फायली रोखल्यास खातेप्रमुखांवर शिस्तभंगाची कारवाई, सांगली जिल्हा परिषदेच्या सीईओ धोडमिसेंचा इशारा

By अशोक डोंबाळे | Published: August 09, 2023 3:37 PM

महिनाभर फायली प्रलंबित

सांगली : जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समितीच्या ठिकाणी काही खातेप्रमुख, कर्मचारी मुद्दाम वेळेत काम करत नाहीत. फायली थांबवून नाहक नागरिकांना त्रास दिला जात आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत असून याची गांभीर्याने अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची गरज आहे. अन्यथा संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिला आहे. यासंबंधीचे लेखी आदेशच सर्व खातेप्रमुख, गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे.जिल्हा परिषदेचा पदभार घेतल्यापासून तृप्ती धोडमिसे यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सर्व विभागांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. यावेळी शिक्षक, कर्मचारी आणि नागरिकांनी धोडमिसे यांच्याकडे खातेप्रमुख, कर्मचारी एकाच बिलासाठी अनेकवेळा तक्रारी काढून त्रास देत आहेत, अशा तक्रारी केल्या होत्या.या तक्रारींची गंभीर दखल घेऊन धोडमिसे यांनी सर्व खातेप्रमुखांना प्रलंबित सर्व फायली निकाली काढण्यात याव्यात. तसेच फायली आठ दिवसांपेक्षा जास्त वेळ थांबली असेल तर यापुढे जबाबदार खातेप्रमुख, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांना प्रत्येक विभागाचा आढावा घेऊन खातेप्रमुख, कर्मचाऱ्यांना स्वच्छ कारभार करण्याची सूचना दिली आहे.

महिनाभर फायली प्रलंबितजिल्हा परिषदेतील सर्व विभागांतील कर्मचारी यांच्याकडून कोणत्याही प्रकरणांतील फायली मंजुरीसाठी वारंवार शक काढले जात आहेत. एकच फाइल तांत्रिक अथवा प्रशासकीय मंजुरीसाठी अनेक महिने प्रलंबित ठेवली असल्याचे दिसून येत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या या कारभाराचा सामान्य नागरिकांना नाहक त्रास होत आहे. याबाबत जे अधिकारी, कर्मचारी गांभीर्याने विचार करणार नाहीत, त्यांच्यावर यापुढे कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही धोडमिसे यांनी दिला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद