शहरं
Join us  
Trending Stories
1
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
2
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
3
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
4
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
5
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
6
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
7
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
8
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
10
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
11
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
12
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
13
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
15
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
16
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
17
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
18
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
19
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
20
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

मी जयंतरावांसोबतच, अजित पवारांच्या भेटीबाबत सांगलीच्या महापौरांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2023 6:52 PM

सूर्यवंशी मुंबईत अजित पवार यांना भेटल्याच्या व फुलांचा गुच्छ देऊन अभिनंदन केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर चर्चेला उधाण

सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नातेसंबंधातून गेलो होतो. त्यांच्या गटात जाण्याचा कोणताही विचार नाही. मी जयंत पाटील यांच्यासोबतच असल्याचा खुलासा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी येथे केला.सूर्यवंशी गुरुवारी मुंबईत अजित पवार यांना भेटल्याच्या व फुलांचा गुच्छ देऊन अभिनंदन केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर चर्चेला उधाण आले. त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याच्या चर्चा सुरू झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना विचारणा केल्याचेही वृत्त आहे.याविषयी पत्रकार बैठकीत ते म्हणाले, मी जयंत पाटील यांचाच कार्यकर्ता आहे. अजित पवार पाहुणे असल्याने भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांच्या गटात जाण्याचा कोणताही विचार नाही. भविष्यात महापालिकेच्या एखाद्या कामासाठी महापौर म्हणून त्यांना भेटेन, पण वैयक्तिक स्तरावर त्यांची भेट घेणार नाही. त्यांच्याकडे जायचे असते, तर जाहीर घोषणा करून गेलो असतो. मुंबईत अजित पवारांनीही भेटीनंतर तशी घोषणा केली असती. अजित पवार यांच्या कार्यालयातून मला शक्तिप्रदर्शन मेळाव्याला येण्यासाठी फोन आला होता. शुक्रवारी बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर जयंत पाटील यांचाही फोन आला होता. त्यांच्याकडे बाजू मांडली आहे.

टॅग्स :SangliसांगलीAjit Pawarअजित पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष