शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Sangli: मिरजेत उमेदवारीसाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग, 'या' दोन नेत्यांची भूमिका महत्त्वाची

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 6:18 PM

सुशांत घोरपडे म्हैसाळ : मिरज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बांशिंग बांधून तयार आहेत, ...

सुशांत घोरपडेम्हैसाळ : मिरजविधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बांशिंग बांधून तयार आहेत, परंतु कोणाला उमेदवारी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार, याची चर्चा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांत रंगली आहे.मिरजविधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व गेली तीन टर्म राज्याचे कामगार मंत्री व पालकमंत्री सुरेश खाडे हे करीत आहेत. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचाच आमदार निवडून आणायचा, असा चंग महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी बांधला आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांची स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी महाविकास आघाडीतील अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बांशिंग बांधून तयार आहेत.महाविकास आघाडीकडून इच्छुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब होनमोरे, राजीव आवळे, प्रमोद इनामदार, अर्जुन कांबळे, उत्तम कांबळे हे इच्छुक आहेत, तर काँग्रेसकडून उद्योगपती सी. आर. सांगलीकर, उद्धवसेनेकडून सिद्धार्थ जाधव, तानाजी सातपुते ही सध्या चर्चेत असणारी नावे आहेत.

मिरज विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी अशीच लढत होणार, हे नक्की आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सध्या एकूण आठ चेहरे आहेत. यापैकी फक्त एकालाच उमेदवारी मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला सोडायचा हे ठरलेले नाही. त्यामुळे कोणत्या पक्षाला मतदारसंघ मिळणार? याची उत्तरे अनुत्तरित असली, तरी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, उद्धवसेना यांनी मात्र हा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे खेचण्याचे ठरविले असल्याचे दिसते. प्रत्येक इच्छुक उमेदवार हे मतदारसंघात फिरताना कार्यकर्त्यांना आत्मविश्वासाने सांगत आहेत की, यंदा मलाच उमेदवारी मिळणार. येत्या काळात मीच मिरजेचा आमदार होणार. त्यामुळे महाविकास आघाडीतील काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांत संभ्रमावस्था आहे.नेमकी उमेदवारी कोणाला महाविकास आघाडीकडून अनेक जण इच्छुक आहेत. ते सर्व मतदारसंघात दौरा करत आहेत. त्या सर्वांना वेगवेगळ्या कार्यक्रमाला बोलाविले जाते. तिथे त्यांचा आदरातिथ्य करताना भावी आमदार असा उल्लेख केला जातो. अशा कार्यक्रमांत आम्ही मात्र प्रत्येकालाच भावी आमदार म्हणत बसलोय, नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार व आमदार कोण होणार? अशी चर्चा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये रंगली आहे.दोन नेत्यांची भूमिका महत्त्वाची !मिरज विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांची ताकद मोठी आहे. त्यामुळे मिरज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरविताना काँग्रेसचे विशाल पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मनोज शिंदे-म्हैसाळकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजvidhan sabhaविधानसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी