शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

मिरज पंचायत समिती बरखास्त करा--सदस्यांची सभेत मागणी :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 11:56 PM

मिरज : शासनाकडून विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याने पंचायत समिती बरखास्त करण्याच्या मागणीचा ठराव मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत शुक्रवारी करण्यात आला.

ठळक मुद्दे शासनाकडून निधी मिळत नसल्याचे कारण; विरोधकांच्या मागणीला भाजपचाही पाठिंबावैद्यकीय अधिकाºयाच्या गैरहजेरीमुळे उपचाराअभावी सर्पदंश झालेल्या बालकास जीव गमवावा लागल्यानेराज्य शासनाने १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना वर्ग केला. इ

मिरज : शासनाकडून विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याने पंचायत समिती बरखास्त करण्याच्या मागणीचा ठराव मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत शुक्रवारी करण्यात आला. राष्टÑवादी व काँग्रेसच्या सदस्यांनी मांडलेल्या ठरावाला सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला. रोजगार हमी योजनेतून गोठा प्रस्तावांना मंजुरी मिळत नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेस सदस्य कृष्णदेव कांबळे यांनी सभागृहात जमिनीवर बैठक मारली. बालकाच्या मृत्यूप्रकरणी सभापती जनाबाई पाटील यांनी आरोग्य अधिकाºयांना धारेवर धरले.

पंचायत समितीची मासिक सभा सभापती जनाबाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती काकासाहेब धामणे, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेत विविध प्रश्नांवर अधिकाºयांना धारेवर धरण्याबरोबरच विरोधी सदस्यांनी भाजप सत्ताधाºयांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

राज्य शासनाने १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना वर्ग केला. इतर योजनांचा लाभही थेट लाभार्थ्याना मिळू लागल्याने, पंचायत समिती सदस्य नामधारी बनले आहेत. तुटपुंज्या सेस फंडातून ग्रामस्थांना दिलेल्या विकास कामांच्या आश्वासनांची पूर्ती करणे शक्य नाही. शासन भरीव निधी देणार नसेल तर पंचायत समिती बरखास्त करा, अशी मागणी राष्टÑवादीचे अशोक मोहिते यांच्यासह काँग्रेसचे अनिल आमटवणे, रंगराव जाधव, कृष्णदेव कांबळे, अजयसिंह मोहिते, कोरे यांनी केली. तसा ठराव करण्याचीही मागणी केली. विरोधकांच्या या मागणीला सत्ताधारी सर्वच भाजप सदस्यांनी समर्थन ठराव संमत केला.

रोजगार हमी योजनेअंतर्गत गोठा प्रस्तावांना तांत्रिक मंजुरी मिळत नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे कृष्णदेव कांबळे यांनी आसनावरून उठून जमिनीवरच बैठक मारली. अनिल आमटवणे, रंगराव जाधव, सतीश कोरे, अशोक मोहिते, अजयसिंह चव्हाण यांनी पशुसंवर्धन अधिकाºयांना धारेवर धरले. दाखल्याऐवजी अल्प व अत्यल्पभूधारकाबाबत प्रस्तावांना मंजुरी देण्याचा तोडगा काढत वादावर पडदा टाकण्यात आला.एरंडोली आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयाच्या गैरहजेरीमुळे उपचाराअभावी सर्पदंश झालेल्या बालकास जीव गमवावा लागल्याने सभापती पाटील यांनी आरोग्य अधिकाºयांना धारेवर धरले. विक्रम पाटील, राहुल सकळे यांनी अधिकाºयावर कारवाईची मागणी केली.‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी आंदोलनाचा इशाराम्हैसाळ योजनेचे पाणी मिरज पूर्व भागात सोडणे आवश्यक असताना, जत व कवठेमहांकाळला सोडण्यात येत आहे. पाणी इतर तालुक्यांना देऊन योजनेच्या थकीत बिलाचा बोजा पूर्वभागातील शेतकºयांच्या सात-बारावर चढविला जातो, हा अन्याय आहे. जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील आमदार आक्रमक आहेत. मात्र पूर्व भागाला पाणी मिळवून देण्यात मिरजेचे आ. सुरेश खाडे कायमच अपयशी ठरत आहेत. आ. खाडे कोठे आहेत? असा सवाल करीत पूर्व भागाला म्हैसाळचे पाणी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा माजी सभापती अनिल आमटवणे यांनी दिला.पुन्हा एकदा भाजपविरोधात ठरावपंचायत समितीत भाजपची सत्ता असतानाही वारंवार भाजप नेत्यांना अडचणीत आणणारे ठराव संमत करण्यात येत आहेत. यापूर्वी कर्जमाफीच्या मागणीसह मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव रोखण्यात आला होता. शुक्रवारी राज्य शासनाच्या धोरणाविरोधात पंचायत समिती बरखास्तीच्या ठरावासही भाजप सदस्यांनी मूकसंमती दिली.अधिकाºयास महिला सदस्याने ठणकावलेकृषी अधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांचे सहाय्यक आढावा घेण्यासाठी उभे राहिल्यानंतर सदस्या छाया हातेकर यांनी त्यास जोरदार आक्षेप घेतला. सभेला आम्ही उपस्थित न राहता पतीला पाठविल्यास चालेल का, असा त्यांनी जाब विचारत, अधिकाºयांनी सभेस उपस्थित राहिलेच पाहिजे, असे त्यांनी ठणकावले.